शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

लांजी बसच्या धडकेत मजूर गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 21:45 IST

येथील लांजी रोडवर खासगी बसच्या धडकेत एक मजूर गंभीर झाला. ही घटना गुरुवारी (दि.३) दुपारच्या सुमारास घडली. घनश्याम शंभू शिवणकर (३७) रा. शंभूटोला असे बसच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या मजुराचे नाव आहे.

ठळक मुद्देबस सुरु करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : येथील लांजी रोडवर खासगी बसच्या धडकेत एक मजूर गंभीर झाला. ही घटना गुरुवारी (दि.३) दुपारच्या सुमारास घडली. घनश्याम शंभू शिवणकर (३७) रा. शंभूटोला असे बसच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या मजुराचे नाव आहे.प्राप्त माहितीनुसार गुरूवारी दुपारी लांजीकडून आमगावकडे येणारी एस.कुमार ट्रॅव्हलसची बस क्रमांक एम.पी.५० पी १८६८ ने समोरुन येणाऱ्या घनश्याम शिवणकर यांना धडक दिली. यात ते गंभीर जखमी झाले. रस्त्यावर उभ्या असलेल्या नागरिकांनी धावून जात शिवणकर यांना वेळीच रुग्णालयात दाखल केले. अपघात झाल्यानंतर ट्रॅव्हल्सच्या चालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र नागरिकांनी त्याला पकडून आणून पोलिसांच्या स्वाधीन केले. आमगाव-लांजी मार्गावर मोठ्या प्रमाणात खासगी बसेस धावतात. मात्र या बसेस चालकांकडून वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष केले जात असल्याने अपघाताच्या संख्येत वाढ झाली आहे. लांजी येथील एस.कुमार ट्रॅव्हल्स कंपनीच्या बसेस धावतात. या बसेसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशी भरले जातात. या बसेसचा वेग देखील अधिक असल्याने बरेचदा अपघाताच्या घटना घडल्या आहेत. मात्र या बसेसवर कारवाई करण्याकडे पोलीस व आरटीओ विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये रोष व्याप्त आहे. गुरूवारी झालेल्या अपघातानंतर या मार्गावरील खासगी बसेस बंद करुन कारवाई करण्याची मागणी आहे.बस सुरु करण्याची मागणीएस.कुमार ट्रॅव्हल्सच्या लांजी-आमगाव प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बस वाहकाकडून योग्य वागणूक दिली जात नसल्याचा आरोप आहे. मात्र या मार्गावर राज्य परिवहन महामंडळाची बस धावत नसल्याने प्रवाशांना खासगी बसेसवरच अवलंबून राहावे लागते. गुरूवारी (दि.३) सुध्दा या खासगी बस मधील प्रवाशांनी अधिक प्रवासी बसविण्यास विरोध केल्यानंतर विरोध करणाऱ्या प्रवाशांना वाहकाने खाली उतरविले. त्यामुळे या मार्गावरील खासगी बसेस बंद करुन गोंदिया आगाराची बस चालविण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे.

टॅग्स :Accidentअपघात