गोंदिया : गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या चांदणीटोला येथील एका तरूणाने मध्यस्ती करणाऱ्या तरूणाला कुऱ्हाडीने मारून ठार करण्याचा प्रयत्न केला. ही घटना २१ मार्चच्या सकाळी ९ वाजतादरम्यान घडली. जितेंद्र ईश्वर चिखलोंडे (२५) असे गंभीर जखमी असलेल्या तरूणाचे नाव आहे. जितेंद्र चिखलोंडे यांच्या घरासमोर आरोपी विजय लिल्हारे हा राजू तिवडे नावाच्या तरूणाला शिविगाळ करीत होता. राजू आपल्याला मोठ्या भावासारखा आहे, कशाला शिविगाळ करतोस म्हणाल्यावर त्यात तिघांची बाचाबाची झाली. रात्री ९ वाजताच्या सुमारास आरोपी दुर्गेशच्या वडीलाला घडलेला प्रकार सांगण्यास गेले असता आरोपीने जितेंद्रच्या डोक्यावर कुऱ्हाडीने घाव घालून ठार करण्याचा प्रयत्न केला. सदर घटनेसंदर्भात गोंदिया ग्रामीण पोलिसांनी भादंविच्या कलम ३०७ सहकलम ४, २५ भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)
कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला
By admin | Updated: March 25, 2017 01:23 IST