शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

कुणबी समाजाने उद्योगाकडे वळावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2016 00:25 IST

वर्षानुवर्षे शेती करणारा कुणबी समाज मागासला. शासक असणारा समाज आज आर्थिक, राजकीय व सामाजिक क्षेत्रात दुबळा होत आहे.

भुनेश्वर शिवणकर : कोजागिरी उत्सव, फलकाचे अनावरणअर्जुनी मोरगाव : वर्षानुवर्षे शेती करणारा कुणबी समाज मागासला. शासक असणारा समाज आज आर्थिक, राजकीय व सामाजिक क्षेत्रात दुबळा होत आहे. शासन प्रत्येकाला नोकरी देऊ शकत नाही. गत वैभव प्राप्त करण्यासाठी समाजाने आपसातील मतभेद विसरुन शेतीला पुरक व्यवसाय करावा. तांत्रिक कौशल्य प्राप्त करुन प्रत्येकाने उद्योजक व्हावे, असे प्रतिपादन जिल्हा उद्योग केंद्र गोंदियाचे अधीक्षक भुनेश्वर शिवणकर यांनी केले.ते तालुकास्तरीय कुणबी समाज बहुउद्देशिय सेवा संस्था द्वारे आयोजित कोजागिरी पौर्णिमा उत्सव समारोहात मार्गदर्शक म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. दिलीप काकडे होते. उद्घाटन योग प्रशिक्षक दादा फुंडे यांच्या हस्ते झाले. प्रमुख अतिथी म्हणून पोलीस उपनिरीक्षक संदीप पाटील, पं.स. सभापती अरविंद शिवणकर, जि.प. सदस्य किशोर तरोणे, कृउबास उपसभापती लायकराम भेंडारकर, जि.प. सदस्य कमल पाऊलझगडे, पं.स. सदस्य पिंगला ब्राम्हणकर, नगर पंचायत नगरसेविका येमू ब्राम्हणकर, गीता ब्राम्हणकर, लक्ष्मी धान गिरणी अध्यक्ष कांता पाऊलझगडे, कार्यकारिणी अध्यक्ष अनिरुद्ध ढोरे उपस्थित होते. किशोर तरोणे यांनी संबोधनातून कुणबी समाजाने प्रत्येक ठिकाणी नेतृत्व करावे. प्रवाहाच्या विरुद्ध जावून स्वत:चे अस्तित्व निर्माण करण्याचे आवाहन केले. पोलीस उपनिरीक्षक संदीप पाटील यांनी, जो समाजासाठी राबला तो समाजाला लक्षात राहिला. शेतकऱ्यांची मुले शिकल्याशिवाय शेतकऱ्यांचा घामाला दाम मिळणार नसल्याचे सांगितले. दादा फुंडे यांनी योगगुरु बाबा रामदेव यांच्या नागपूर येथील फुडपार्कमध्ये येणाऱ्या दिवसात दुधासोबतच गाईचे गोमूत्र, गुरवेल, ज्वारफाटा याची गरज पडेल. ही शेती करा. प्रगतीमध्ये श्रम आवश्यक असते. समाजाने स्वत:सोबत इतर जातीधर्मांनाही सोबत घेवून चालावे, असे मत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणातून डॉ. दिलीप काकडे यांनी, समाजाने क्रांतीसाठी डॉ. बाबासाहेब व भगवान गौतम बुद्ध यांच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलवा. बुद्धांचे तत्वज्ञान अंगिकारा. मराठा मूक मोर्चा कुणबीयांचे संयम दर्शविते. विचार स्वीकारा, क्रांती होईल. संघटन हे येणाऱ्या पिढीसाठी आहे. नेत्यांवर विश्वास ठेवण्यापेक्षा संघटन मजबूत करा, असे मत मांडले. कार्यक्रमाची सुरुवात संतसिरोमणी तुकाराम महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमापूजन व माल्यार्पणाने झाली. उरी हमल्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. कार्यक्रमापूर्वी लाखांदूर रोडवरील टी-पार्इंटला छत्रपती शिवाजी महाराज चौक म्हणून नामकरण केले गेले. फलक व ध्वजाचे अनावरण झाले. संघटनेच्या वतीने तालुक्यातील १३ गावांमधील गाव कार्यकारिणीचे स्वागत करण्यात आले. दहावी व बारावीमधील प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.प्रास्ताविक अनिरुद्ध ढोरे यांनी मांडले. संचालन पद्मजा मेहंदळे यांनी केले. आभार सुनिता हुमने यांनी मानले. कार्यक्रमासाठी समाज संघटना, जिजाऊ महिला ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी )