शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

कोविड सेंटर गुंडाळले, कर्मचारी बेरोजगार झाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2021 05:00 IST

त्या कर्मचाऱ्यांनी  कोविड काळात हव्या त्या वेळेला उपस्थित राहून कोविड सेंटरला हजर राहून आपली सेवा दिली. त्यावेळी त्यांना अनेक प्रकारे कोविड संसर्गाच्या धोका सुद्धा पत्करावा लागला. अशात त्यांना अनेक आवाहन सुद्धा पेलावी लागली असून लोकांच्या व रुग्णांच्या रोषाला सुद्धा समोर जावे लागले. मात्र शासनाने कोविड सेंटर गुंडाळून त्या आरोग्य कर्मचाऱ्यांना एका झटक्यात काढून टाकले. त्यामुळे त्या सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांवर अचानक बेरोजगारी आणि उपासमारीचे संकट ओढावले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : गोंदिया जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरली असून संपूर्ण जिल्हा कोविडमुक्त होण्याच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. त्यातच सालेकसा तालुका एक महिना पूर्वीच कोविड मुक्त झाला व लगेच ८ जुलैला येथील कोविड केअर सेंटर सुद्धा गुंडाळले. त्यामुळे एकीकडे आरटीपीसीआर चाचण्या बंद करण्यात आल्या. परंतु त्याच बरोबर आरोग्य विभागाने आता कोविड केअर सेंटरवरील आरोग्य कर्मचाऱ्यांना सेवा मुक्त केला आहे. त्यामुुळे या कर्मचाऱ्यांवर बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. मागील दीड वर्षांपासून कोविड १९ नावाच्या विषाणूने सर्वत्र कहर माजविला असून या दरम्यान गोंदिया जिल्ह्यात सुद्धा कोविड १९ चा शिरकाव झाला आणि आरोग्य विभाग हतबल होऊ लागले. अशात आरोग्य विभागाने जिल्हा मुख्यालयातील कोविडचा औषधोपचार करण्याचा तसेच चाचण्या करण्याचा ताण कमी करण्यासाठी तसेच कोविड रुग्णांची ताबडतोब नमूना तपासणी आणि औषधोपचार करण्यासाठी प्रत्येक तालुका स्तरावर तसेच इतर मुख्य ठिकाणी कोविड केअर सेंटर उभारले. या सेंटर येणाऱ्या प्रत्येक संशयीत रुग्णांची आरटीपीसीआर किंवा रॅपिड अँटिजन टेस्टची सोय. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांसाठी औषधोपचार तापमान, ऑक्सिजन लेवल तपासणी, औषध साठा तसेच गंभीर रुग्णांसाठी भरतीची सोय सोबतच क्वारंटाईन सेंटर सुद्धा उभारण्यात आले. या सर्व सोयी सुविधा सुरक्षित व सुरळीतरित्या पुरविण्यासाठी तालुक्यातील आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांना नियुक्त केले. परंतु २४ तास सतत सेवा देताना ताण वाढत चालल्यामुळे इतर अंशकालीन आरोग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली. त्या कर्मचाऱ्यांनी  कोविड काळात हव्या त्या वेळेला उपस्थित राहून कोविड सेंटरला हजर राहून आपली सेवा दिली. त्यावेळी त्यांना अनेक प्रकारे कोविड संसर्गाच्या धोका सुद्धा पत्करावा लागला. अशात त्यांना अनेक आवाहन सुद्धा पेलावी लागली असून लोकांच्या व रुग्णांच्या रोषाला सुद्धा समोर जावे लागले. मात्र शासनाने कोविड सेंटर गुंडाळून त्या आरोग्य कर्मचाऱ्यांना एका झटक्यात काढून टाकले. त्यामुळे त्या सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांवर अचानक बेरोजगारी आणि उपासमारीचे संकट ओढावले आहे. सालेकसा तालुक्यातून सुद्धा दोन स्टाप नर्स, एक प्रयोगशाळा तंत्रज्ञ, दोन डाटा एन्ट्री ऑपरेटर आणि एका वाॅर्ड बायला सेवामुक्त करण्यात आले आहे. त्यांना पुन्हा सेवेत रुजू करण्यात यावे, अशी मागणी केली. सेवेत कायम ठेवण्याची मागणी - आरोग्य विभागाने एकूण १३१ आरोग्य कर्मचाऱ्यांना सेवामुक्त केले त्यात ११ डॉक्टर, १० प्रयोगशाळा तंत्रज्ञ, १३ डाटा एन्ट्री ऑपरेटर, ६० स्टॉप नर्स, ९ औषधी निर्माता, ०३ इसीजी टेक्नीशियन, आणि ५ एक्सरे टेक्नीशियन यांचा समावेश आहे. केरळसह देशातील इतर राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना पुढे महाराष्ट्रात सुद्धा तिसरी लाट येण्याची शक्यता अजिबात नाकारता येत नसून अशात त्या कर्मचाऱ्यांना सेवेत कायम ठेवणे आवश्यक होते.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याUnemploymentबेरोजगारी