शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

कोविड गर्भवतींना रेफर टू नागपूरला ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2020 05:00 IST

४ कोविड गर्भवंतीवर सिझरिंगची शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यामुळे आता कोविड गर्भवतींना रेफर टू नागपूर करणे पूर्णपणे बंद झाल्याचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता नरेश तिरपुडे यांनी सांगितले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सीटी स्कॅन मशिन बंद असल्याने रुग्णांना खासगी रुग्णालयात जावून उपचार घ्यावा लागत होता.

ठळक मुद्देबीजीडब्ल्यू रुग्णालयात कक्ष सुरू : १२ कोविड गर्भवतींची केली प्रसूती

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोविड गर्भवतींची प्रसूतीची सोय नसल्याने त्यांना नागपूर मेडिकलला रेफर केले जात होते. त्यामुळे गर्भवती महिला आणि त्यांच्या कुटुंबीयांना त्रास सहन करावा लागत होता. आता ही अडचण दूर झाली असून येथील बीजीडब्ल्यू रुग्णालयात यासाठी विशेष कक्ष तयार करण्यात आले आहे. मागील आठ दिवसांच्या कालावधीत या कक्षात १२ कोविड गर्भवतींची प्रसूती करण्यात आली. तर ४ कोविड गर्भवंतीवर सिझरिंगची शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यामुळे आता कोविड गर्भवतींना रेफर टू नागपूर करणे पूर्णपणे बंद झाल्याचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता नरेश तिरपुडे यांनी सांगितले.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सीटी स्कॅन मशिन बंद असल्याने रुग्णांना खासगी रुग्णालयात जावून उपचार घ्यावा लागत होता.आता ही समस्या सुध्दा दूर झाली असून नवीन सीटी स्कॅन मशीन सुरू करण्यात आली आहे. कोरोना संक्रमण काळात रुग्णांची गैरसोय होणार नाही, यासाठी केटीएस आणि मेडिकलमध्ये बेडची संख्या वाढविण्यात आली आहे.या दोन्ही रुग्णालयात आतापर्यंत ७७६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण दाखल होते. यापैकी ५६३ रुग्ण कोरोनामुक्त होवून घरी परतले आहेत.कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर ७१.२६ टक्के आहे. डॉक्टर आणि परिचारिकांची रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. १६ पैकी ६ डॉक्टर आणि ७१ पैकी ३ परिचारिका रूजू झाल्या आहेत. लवकरच इतर समस्या सुध्दा मार्गी लावण्यात येणार असल्याचे अधिष्ठाता तिरपुडे यांनी सांगितले.पंधरा दिवसात सुरू होणार प्लाझ्मा थेरपी सेंटरयेथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्लाझ्मा थेरपी सेंटर नसल्याने कोरोनाच्या गंभीर रुग्णांवर प्लाझ्मा थेरपी करण्याची अडचण निर्माण होते. तर प्लाझ्मा डोनर तयार असताना सुध्दा थेरपी करण्यासाठी आवश्यक यंत्रसामुग्री नसल्याने अडचण निर्माण होत होती. ही अडचण आता दूर केली जाणार असून येत्या पंधरा दिवसात मेडिकलमध्ये प्लाझ्मा थेरपी सेंटर सुरू करण्यात येणार असल्याचे अधिष्ठाता तिरपुडे यांनी सांगितले.२४ तासात मिळणार अहवालगोंदिया येथील स्वॅब नमुने तपासणी प्रयोगशाळेत नमुने तपासणीची संख्या वाढल्याने आठ आठ दिवस अहवाल मिळत नव्हता. परिणामी संसर्ग वाढण्याचा धोका निर्माण झाला होता. मात्र आता स्वॅब नमुने तपासणीचे प्रमाण वाढविण्यात आले असून २४ तासात स्वॅब नमुन्याचा अहवाल मिळणार आहे.

टॅग्स :hospitalहॉस्पिटल