शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कोष्टी व हलबा कोष्टी हे हलबा हलबी नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 21:26 IST

आरक्षणाच्या नावावर आजकाल कोणीही उठतो आणि जीभ टाळूला लावतो. परिणामाचा विचार न करता समाजात तेढ निर्माण होईल असे व्यक्तव्य केले जात असल्याचा आरोप अ‍ॅड.नामदेव किरसान यांनी केला आहे.

ठळक मुद्देनामदेवराव किरसान : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : आरक्षणाच्या नावावर आजकाल कोणीही उठतो आणि जीभ टाळूला लावतो. परिणामाचा विचार न करता समाजात तेढ निर्माण होईल असे व्यक्तव्य केले जात असल्याचा आरोप अ‍ॅड.नामदेव किरसान यांनी केला आहे. ज्यांनी ज्या हलबा हलबींची नोंद महाराष्ट्राच्या अनुसूचित जमातीच्या अनुसूचित १९ व्या क्र मांकावर आहे. जे त्या जमातीचे असल्याची पूर्तता करीत आहेत. जातीचे प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र धारण करीत आहेत. अशा खºया हलबा हलबींना खरे हलबा हलबी नसून, कोष्टीच खरे हलबा हलबी आहेत. अशा प्रकारचे व्यक्तव्य काहीजण करून खºया हलबा, हलबीमध्ये रोष निर्माण करून असुरिक्षततेची भावना निर्माण करीत असल्याचा आरोप किरसान यांनी केला आहे.कोष्टी व हलबा कोष्टी हे हलबा किंवा हलबी नाहीत व ते अनुसूचित जमातीत मोङत नाहीत. असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र शासन विरूद्ध मिलिंद कटवारे व इतर सिव्हिल अपील क्र .२२९४, १९८६ या प्रकरणात २८ नोव्हेंबर २००० रोजी च्या निर्णयात दिलेला आहे. अशा अनेक प्रकारणात कोष्टी व हलबा कोष्टी हे हलबा, हलबी नाहीत. असा निर्णय उच्च व सर्वोच्य न्यायालयाने दिला आहे. असे असताना ६ जुलै २०१७ च्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयात अशा रितीने जात बदलून खोटे प्रमाणपत्राच्या आधारावर नोकरी मिळविणाºयांना बडतर्फ करून गुन्हे नोंदविण्याचे आदेश दिले आहे.मात्र यानंतरही काहीजण तेच तेच मुद्दे उपस्थित करुन खºया आदिवासींचे हक्क व अधिकार हिरावून पाहत आहेत. त्यामुळे या प्रकाराचा निषेध करतो. त्यामुळे अशा प्रवृत्तीच्या लोकांवर कारवाई करण्यात यावी.अशी मागणी सुध्दा शिष्टमंडळातर्फे जिल्हाधिकारी डॉ.कांदबरी बलकवडे यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.शिष्टमंडळात अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे सचिव अ‍ॅड.नामदेव किरसान, माजी सभापती श्रावण राणा, हिरालाल फाफणवाडे, शिवानंद फरदे, सुभाष चुलपार, आनंद लंजे, मोहन राऊत, टेकेश्वर सोयाम, विजय मडावी यांचा समावेश होता.