शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या वैमनस्यातून तरूणाचा धारदार शस्त्राने मारून खून; तिघांना पोलिसांनी घेतले ताब्यात

By नरेश रहिले | Updated: August 23, 2024 19:47 IST

जुन्या वैमनस्यातून तिघांनी तरुणाला धारदार शस्त्राने वार करून ठार केल्याची घटना शहरातील छोटा गोंदिया परिसरातील चिचबन मोहल्ला येथे गुरूवारी (दि.२२) रात्री ११ वाजेदरम्यान घडली.

नरेश रहिले

गोंदिया : जुन्या वैमनस्यातून तिघांनी तरुणाला धारदार शस्त्राने वार करून ठार केल्याची घटना शहरातील छोटा गोंदिया परिसरातील चिचबन मोहल्ला येथे गुरूवारी (दि.२२) रात्री ११ वाजेदरम्यान घडली. विकास उर्फ विक्की श्रीराम फरकुंडे (वय २९, रा. छोटा गोंदिया) असे मृत तरूणाचे नाव आहे. या प्रकरणात पोलिसांनी काही तासांतच तिघा आरोपींना ताब्यात घेतले आहे.

विकास फरकुंडे व आरोपी लक्की सुनील मेश्राम (वय १८, रा. संजयनगर) यांचे जुने भांडण होते. असे असतानाच गुरूवारी (दि.२२) रात्री ११ वाजता छोटा गोंदिया येथे त्यांच्यात पुन्हा बाचाबाची झाली. या बाचाबाचीतून आरोपी लक्की मेश्राम व दोन विधी संघर्ष बालकांनी त्याला धारदार शस्त्राने गळ्यावर, छातीवर, पोटावर व शरीरावर वार करून ठार केले. श्रीराम बुधराम फरकुंडे (वय ६०, रा. छोटा गोंदिया) यांच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम कलम १०३ (१) अन्वये शुक्रवारी (दि.२३) पहाटे ३:०८ गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपींना शोधण्यासाठी विविध पथके

या प्रकरणातील आरोपींना शोधण्यासाठी शहर पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेने विविध पथके तयार करून काही वेळातच आरोपींना ताब्यात घेतले.यांनी केली कारवाई

 हा प्रकार घडल्यानंतर एकच खळबळ माजली व पोलीस अधीक्षक गोरख भामरे, अप्पर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा यांनी खून प्रकरणातील गुन्हेगारांचा कसोशीने शोध घेऊन तत्काळ जेरबंद करून खून प्रकरणाचा उलगडा करण्याचे निर्देश पोलीस निरीक्षक शहर आणि पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी बानकर यांच्या मार्गदर्शनात, शहर पोलीस निरीक्षक किशोर पर्वते यांच्या नेतृत्वात गुन्हे प्रकटीकरण पथक आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश लबडे यांच्या नेतृत्वात पोलीस हवालदार राजू मिश्रा, महेश मेहर, सोमेंद्र तुरकर, इंद्रजित बिसेन, सुबोध बिसेन, छगन विठ्ठले, अजय रहांगडाले, चालक पोलीस शिपाई मुरली पांडे, घनश्याम कुंभलवार, खंदारे यांनी कारवाई केली.आरोपींना केले शहर पोलिसांच्या स्वाधीन

- आरोपी लक्की मेश्राम व विधी संघर्ष बालकांना शहर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. पुढील तपास व कायदेशीर कारवाई प्रक्रिया शहर पोलीस करीत आहेत.दोन महिन्यांपासून सुरू होता वाद

- दोन विधी संघर्षित बालक व आरोपी लक्की मेश्राम यांचा मृत विकास फरकुंडे याच्यासोबत मागील दोन महिन्यांपासून वाद सुरू होता. या वादाची परिणीती खुनात बदलली आहे.