शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

खरीप पिकांवर १८१ हेक्टरमध्ये कीडरोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2018 21:14 IST

नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात डिसेंबर महिन्यामध्ये खरिपाच्या धानपिकांवर कीडरोगाच्या प्रादुर्भावाचे सर्वेक्षण करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार, कृषी विभागाने सर्वेक्षण केले असून जिल्ह्यात १८१.४१२ हेक्टर क्षेत्र कीडरोगाने प्रभावित झाल्याचा अहवाल तयार केला आहे.

ठळक मुद्देकृषी विभागाचा अहवाल : रब्बीच्या १८२ हेक्टरमधील पिकांवर कीडरोग

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात डिसेंबर महिन्यामध्ये खरिपाच्या धानपिकांवर कीडरोगाच्या प्रादुर्भावाचे सर्वेक्षण करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार, कृषी विभागाने सर्वेक्षण केले असून जिल्ह्यात १८१.४१२ हेक्टर क्षेत्र कीडरोगाने प्रभावित झाल्याचा अहवाल तयार केला आहे.जिल्ह्यात खरिपाच्या पेरणीचे लागवड क्षेत्र सहा हजार ४७१ हेक्टर आहे. त्यात १८१.४१२ हेक्टरमधील पीक कीडरोगांनी ग्रसित झाल्याचे कृषी विभागाचे म्हणणे असून याची टक्केवारी २.८० आहे. त्यात पाने गुंडाळणाऱ्या अळीमुळे ०.८० टक्के पीक (५१.८३२ हेक्टर) ग्रसित झाले होते. त्यापैकी ५१ हेक्टरमधील पिकांवर फवारणी करून उपचार करण्यात आला. तर घाटेअळी व शेंगा पोखरणारी अळी यामुळे दोन टक्के (१२९.५८ हेक्टर) पीक बाधित झाले होते. त्यातील १२९ हेक्टरमधील पिकांवर फवारणी करून उपचार करण्यात आल्याचे कृषी विभागाच्या अहवालात नमूद आहे.या शिवाय, रब्बी हंगामात जानेवारी २०१८ मध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणात १८२.६९ हेक्टरमधील (२.६० टक्के) रब्बीचे पीक प्रभावित झाल्याचे सांगण्यात आले आहे. त्यापैकी १८२ हेक्टरमधील पिकांवर पीकनिहाय उपचार करण्यात आल्याचे अहवालात नमूद आहे. यात मर रोगाची टक्केवारी २ (१४०.५३ हेक्टर) आहे. त्यापैकी १४० हेक्टर क्षेत्रात फवारणी करण्यात आली. तर घाटेअळीने प्रभावित क्षेत्र ०.६० टक्के (४२.१५९ हेक्टर) असून त्यापैकी ४२ हेक्टरमधील प्रभावित पिकांवर फवारणी करण्यात आल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे.प्रभावित क्षेत्रावर प्रश्नचिन्हकृषी विभागाने दिलेल्या अहवालात जे कीड रोगाने ग्रसित क्षेत्र दाखविले आहे, त्याचे प्रत्यक्ष सर्वेक्षण करण्यात आले किंवा नाही, यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. सर्वेक्षण सुरू होण्याच्या पूर्वीच जवळपास ९० टक्के पिकांची कापणी आटोपली होती. शेतकऱ्यांच्या शेतात पीकही नव्हते. शिवाय फवारणी (उपचार) केलेल्या क्षेत्राची संख्या त्यांनी कोणत्या आधारावर दर्शविली, हे सुद्धा सांगायला मार्ग नाही. त्यामुळे कृषी विभागाने आपल्या अहवालात जी संख्या दर्शविली आहे, त्यातील सत्यतेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.