शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

जन्मदात्याने केली मुलाची हत्या

By admin | Updated: August 28, 2016 01:04 IST

घरगुती वाद विकोपाला गेल्याने व्यसनाधीन पित्याने चक्क मुलाची हत्या केली. या वादात पत्नीलाही मारहाण केली. दुखापत झाली आहे.

पित्याचा आत्महत्येचा प्रयत्न : मोहाडी (खापा) येथील घटना चुल्हाड/तुसमर : घरगुती वाद विकोपाला गेल्याने व्यसनाधीन पित्याने चक्क मुलाची हत्या केली. या वादात पत्नीलाही मारहाण केली. दुखापत झाली आहे. आरोपी पित्याला अटक करण्यात आली असून हरेंद्र जयेंद्र शरणागत (२१) असे मृत मुलाचे नाव आहे. ही घटना तालुक्यातील मोहाडी (खापा) येथे २५ आॅगस्ट रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास घडली. सिहोरा येथुन ३ किमी अंतरावर असलेल्या मोहाडी (खापा) गावात जयेंद्र शरणागत याच्या कुटूंबात पत्नी आणी मुले आहे. जयेंद्र शरणागत याला दारुचे व्यसन आहे. २५ आॅगस्ट सायंकाळी जयेंद्रने पत्नी आणि मुलाला दारुकरिता पैसे मागितले. पंरतु त्यांनी जयेंद्रला पैसे दिले नाही. यामुळे जयेंद्रने वाद घालण्यास सुरुवात केली. या वादातुन जयेंद्रने आधी पत्नी शामकला शरणागत हिला जबर मारहाण केली. तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. वाद सुरु असतानाच जयेंद्रने मुलाच्या डोक्यावर लोखंडी सबळीने मारहाण केली. जखमी हरेंद्र व त्याची आई शामकला हिला उपचारासाठी गावकऱ्यांनी खाजगी दवाखान्यात नेले. नागपुरला नेत असतांना त्याची प्राणज्योत मालविली. इकडे घरात असलेल्या जयेंद्र शरणागत याने दुसऱ्याच्या विहिरीत उडी घेवून आत्महत्येचा प्रयत्न केला असता गावकऱ्यांनी त्याला वाचविले. हरेंद्र हा कला विद्यालय सिहोरा येथे द्वितीय वर्षाचा विद्यार्थी होता. जयेंद्र शरणागत याला दारुचे वेसन जडले होते. यामुळे पैशाचे मागणी वरुन त्याचे रोजचे घरात भांडण सुरु होते. यामुळे त्याचा एक मुलगा शैलेंद्र हा गुजरात राज्यात रोजगार निमित्त निघून गेला. घरात पत्नी, हरेंद्र आणि एक १७ वर्षीय मुलगी आहे. फिर्यादी दुर्गा शरणागत यांचे तक्रारीवरुन जयेंद्र शरणागतविरूद्ध भादंवीच्या ३०२, ३०७ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. त्याला त्याच्या घरातुन सिहोरा पोलिसांनी अटक केली आहे. तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम माळी यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस उपनिरीक्षक नागेश झायले करित आहेत.मोहाडीत गुन्हेगारी वाढतेयचुल्हाड-चांदपूर मार्गावरील पंचायत समिती क्षेत्र असलेल्या मोहाडी (खापा) गावात घरगुती वादातुन गुन्हेगारी वाढत असल्याचे चित्र आहे. या आधी भावाने बहिनीची हत्या केली असून सावत्र भावाने कुटूंबातील संपत्तीच्या वादातून सख्खा भावाचा ५ जणांचा कुटूंब व वडीलाला यमसदणी पाठविल्याची घटना याच गावातील आहे. या शिवाय प्रियकराच्या मदतीने पतीला ठार करण्यात आले होते. मोहाडीत गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. (वार्ताहर/तालुका प्रतिनिधी)