शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

खरिपाची नजरअंदाज पैसेवारी ७४ पैसे

By admin | Updated: September 21, 2015 01:39 IST

धानाचे कोठार समजल्या जाणाऱ्या भंडारा जिल्ह्यात किडींचा प्रादुर्भाव आणि निसर्गाच्या प्रकोपामुळे धान पिकाचे उत्पादन घटण्याची शक्यता आहे.

लोकमत विशेषदेवानंद नंदेश्वर  भंडाराधानाचे कोठार समजल्या जाणाऱ्या भंडारा जिल्ह्यात किडींचा प्रादुर्भाव आणि निसर्गाच्या प्रकोपामुळे धान पिकाचे उत्पादन घटण्याची शक्यता आहे. जिल्हा प्रशासनाने खरीप पिकांची नजरअंदाज हंगामी पैसेवारी ७४ पैसे घोषित केली आहे. शेतकरी परतीच्या पावसामुळे सुखावला असला तरी किडींचा प्रादुर्भावामुळे उत्पादनात घट होण्याचे संकट उभे आहे, असे असताना जिल्हा प्रशासनाने घोषित केलेल्या पैसेवारीवर शेतकऱ्यांनी संशय घेतला आहे.मृगाच्या प्रारंभी धो धो बरसलेल्या पावसाने आगामी पीक वाढीसाठी पाठ फिरविली. आॅगस्ट व सप्टेंबर महिन्यात पिकांसाठी अपेक्षित पाऊस बरसला नाही. त्यामुळे कधी मोटारपंपाच्या सहाय्याने तर कधी तलाव, बोड्यांमधून बादलीने पाणी देऊन पीक वाचविण्याचा केविलवाणा प्रयत्न शेतकऱ्यांकडून झाला. १ लाख ८२ हजार ६७० हेक्टर क्षेत्रात खरीप पिकाची लागवड करण्यात आली आहे. त्याची टक्केवारी ९१ टक्के एवढी आहे. धानपिकाची ९० टक्के म्हणजेच १ लक्ष ६३ हजार ८८३ हेक्टरमध्ये लागवड झालेली आहे. नुकत्याच झालेल्या परतीच्या पावसाने शेतकरी धिरावला असला तरी धान पूर्णपणे हाती येईपर्यंत पावसाची नितांत आवश्यकता आहे. मात्र पाऊस वेळोवेळी दगाफटका करीत असल्याने शेतकऱ्यांच्या मनातली भीती कायम आहे. परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या मरणासन्न असलेल्या शेतपिकाला नवसंजीवनी मिळाली. आता हे पीक डौलाने उभे आहे. मागील चार वर्षांपासून जिल्हा दुष्काळाच्या छायेत आहेत. यावर्षी देखील पावसाचे प्रमाण अत्यल्प असून धरणे, नदी, नाले, बोड्या पाण्याचा साठा कमीच आहे. शेतात डौलाने उभे असलेले पीक एका पाण्याने व किडींच्या प्रादुर्भावाने निसटण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे सहाजिकच धानाचे उत्पादन घटण्याची शक्यता अधिक आहे. जिल्हा प्रशासनाने ८४६ गावांची नजरअंदाज हंगामी पैसेवारी ७४ पैसे दर्शविली आहे. ही सर्व गावे ६७ पैसेपेक्षा जास्त पैसेवारी दाखविण्यात आली आहे. ६७ पैसेपेक्षा जास्त पैसेवारी असलेल्या ८४६ गावांमध्ये भंडारा तालुक्यातील १६९ गावांची पैसेवारी ७२ पैसे, मोहाडी तालुक्यातील १०८ गावांची पैसेवारी ७७ पैसे, तुमसर तालुक्यातील १४३ गावांची पैसेवारी ७२ पैसे, पवनी तालुक्यातील १४१ गावांची पैसेवारी ७७ पैसे, साकोली तालुक्यातील ९४ गावांची पैसेवारी ७२ पैसे, लाखांदूर तालुक्यातील ८९ गावांची पैसेवारी ७१ पैसे आणि लाखनी तालुक्यातील १०२ गावांची पैसेवारी ७६ पैसे दाखविण्यात आली आहे. १० गावे अकृषक पाण्याखाली पिक असल्यामुळे त्या गावांची पैसेवारी जाहीर करण्यात आली नाही. यामध्ये पवनी तालुक्यातील सर्व १० गावांचा समावेश आहे. जिल्ह्यातील ८८९ एकूण गावांपैकी ८४६ गावांमध्ये खरीप पिकांची लागवड करण्यात आली. १० गावांमध्ये दोन तृतीयांश क्षेत्रामध्ये खरीप पिकांची पेरणी केलेल्या रबी गावे आहेत. १५ दिवसांपूर्वीच पैसेवारी जाहीर !राज्य शासनाच्या ४ मार्च १९८९ च्या ठरावानुसार नागपूर विभागाची खरीप हंगाम नजरअंदाज पैसेवारी ३० सप्टेंबर रोजी जाहीर होते. यावर्षी केंद्र शासनाला माहिती देण्याच्या अनुषंगाने नागपूर विभागाची नजरअंदाज पैसेवारी ३० सप्टेंबरऐवजी १५ सप्टेंबर जाहिर करण्याचे निर्देश देण्यात आले. त्यानुसार पैसेवारी घोषित करण्यात आली आहे.निकष बदलले४यापुर्वी ५० पैसेच्या आत व ५० पैसेपेक्षा अधिक अशी पैसेवारीची पध्दत होती. यावर्षी सुधारीत पध्दतीचा अवलंब करण्यात आला. या पध्दतीनुसार मागील पाच वर्षांतील उत्पन्नाची सरासरी हे प्रमाण समजून ६७ पैसेपेक्षा कमी व ६७ पैसेपेक्षा अधिक यानुसार पैसेवारी जाहिर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत.