शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

खरीप पिकाचे उत्पादन घटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2019 05:00 IST

खरीपातील धान पिकाला जोरदार फटका बसला आहे. हलके व मध्यम प्रजातीचे धान काही ठिकाणी निसवून कापणीच्या स्थितीत आहे. तर काही ठिकाणी उशीरा लागवड केलेले धान पीक अतिवृष्टीमुळे सडले. पिकाचे नुकसान झाल्याने उत्पादनात घट होण्याची भीती शेतकऱ्यांनी वर्तविली आहे.

ठळक मुद्देशेतकरी चिंताग्रस्त : बदलत्या वातावरणाचा पिकांवर परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : धान उत्पादनात पुढे असलेला जिल्ह्याला काही दिवसांपासून परतीच्या पावसाने झोडपल्याने खरीपातील धान पिकाला जोरदार फटका बसला आहे. हलके व मध्यम प्रजातीचे धान काही ठिकाणी निसवून कापणीच्या स्थितीत आहे. तर काही ठिकाणी उशीरा लागवड केलेले धान पीक अतिवृष्टीमुळे सडले. पिकाचे नुकसान झाल्याने उत्पादनात घट होण्याची भीती शेतकऱ्यांनी वर्तविली आहे.सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात आलेल्या वादळी पावसाने व जोरदार संततधारेने शेकडो एकरातील धान भुईसपाट झाले आहे. पावसामुळे धान खाली पडल्याने शेतशिवारात पिकाचा सडका वास येत आहे.कित्येक शेतकरी धानासह तूर पिकावर महागडी औषधे फवारणी करताना दिसत आहेत. तीन वर्षाचा दुष्काळ झेलत हिंमतीने शेतकऱ्यांनी यावर्षीच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात खर्च केला होता. मात्र निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांना यावर्षीही पावसाचा फटका बसला आहे.जून महिन्यात पावसाच्या अत्यल्प हजेरीने शेतकऱ्यांनी पेरणी, रोवणी अर्धी लांबली होती.जुलै महिन्यात समाधानकारक पावसाला सुरुवात झाली खरी, परंतु पावसाने काही ठिकाणीच हजेरी लावली. सुरुवातीच्या कालखंडात योग्य वेळी पाऊस न झाल्याने बºयाच शेतकऱ्यांना रोवणी पूर्ण करता आली नाही.ऑगस्ट महिन्यात हजेरी लावलेल्या पावसामुळे निंदनासह शेती कामांना खऱ्या अर्थाने पुन्हा वेग आला होता. त्यानंतर मात्र संततधार पावसामुळे धान कमी पण तण जास्त, अशी स्थिती झाल्याने यावर्षी शेतकऱ्यांच्या खर्चात वाढ झाली आहे. सप्टेंबर महिना अखेरपर्यंत समाधानकारक पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. परंतु पावसाची रिपरिप लवकर बंद न झाल्याने काही तालुक्यातील धानपिक जागेवर सडले. आजही शेतशिवारात त्यांची दुर्गंधी पसरत आहे. दिवसभर ढगाळ हवामानामुळे किडीचा प्रादुर्भाव वाढला आहे. धानाला तुडतुडा, अळी, करपा, कडाकरपा सारख्या रोगांनी तर तूर पिकावर पाने गुंडाळणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.निसवणाऱ्या अवस्थेतील धानाच्या लोंबी पूर्णत: पांढरे होत असून त्याचा परिणाम दाने भरण्यावर झाला आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेतात दाने पोचटच असल्याचे दिसून येत आहे. शेतकऱ्यांना योग्य सल्ला देऊन उपाययोजना केल्यास शेतकऱ्यांना काही प्रमाणात नुकसान टाळता येऊ शकते. त्यासाठी अधिकाऱ्यांनी सर्वेक्षण करुन गावागावात मार्गदर्शन शिबिर सुरु करणे गरजेचे आहे.हमीभाव कागदावरचजिल्ह्यात खरीप हंगाम सुरु झाल्यानंतर प्रारंभी पावसाने हजेरी लावली. परंतु काही दिवसात दिर्घ उसंत घेतली होती. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पेरणीचे नियोजन चुकले. नंतर आलेल्या पावसाने शेतकऱ्यांना दिलासा दिला होता. ऑक्टोबर महिन्यात आलेल्या परतीच्या पावसाने धान उत्पादक शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर पाणी फेरले. एकीकडे पाण्यामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर पाणी फेरले. एकीकडे पाण्यामुळे कपाशीची गळती तर दुसरीकडे परतीच्या पावसाने कापणी केलेले धान ओले असे चित्र गोंदिया जिल्ह्यात दिसून येत आहे. त्यामुळे दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. यावर्षी मृगाच्या पावसाने चांगली हजेरी लावली होती. मात्र नंतर दडी मारली.सप्टेंबर महिन्यात आलेल्या पावसाने शेतकऱ्यांचे स्वप्न भंगले. तालुक्यात हलके धान निघाले १८ ते २० पण समाधानकारक दर न मिळाल्याने शेतकरी हैरान झाला. शेतकऱ्यांच्या शेतमालाला कमी प्रमाणात ओलसर असला तरी प्रमाण अधिक असल्याचे सांगून भाव कमी देत आहे.शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणीधान पिकाची स्थिती फारच बिकट असल्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले. धान पिकावर केलेला खर्च निघतो की नाही अशी धडकी शेतकऱ्यांना भरली आहे. मंजुराअभावी शेतकरी हैरान असल्याचे दिसून येत आहे. लागवडीवर प्रचंड खर्च करुनही उत्पन्न किती होईल याचा अंदाज सुध्दा बांधणे कठीण झाले.निघालेल्या उत्पादनाला अल्प प्रमाणात असलेला बाजारभाव यामुळे लावलेला खर्चही निघणे कठीण झाले आहे.

टॅग्स :agricultureशेती