शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

शासन निर्णयाला सचिवाने दाखविली केराची टोपली

By admin | Updated: August 25, 2016 00:18 IST

कट्टीपार व गोसाईटोला ग्रामपंचायतीअंतर्गत शाळा दुरुस्ती आणि शालेय आवार भिंतीच्या बांधकामात ई- निविदेने साहित्य खरेदी करण्यात आले नाही.

गावकऱ्यांची तक्रार : कट्टीपार येथील सचिवाचा प्रतापकालीमाटी : कट्टीपार व गोसाईटोला ग्रामपंचायतीअंतर्गत शाळा दुरुस्ती आणि शालेय आवार भिंतीच्या बांधकामात ई- निविदेने साहित्य खरेदी करण्यात आले नाही. असा ठपका ठेवत गावकऱ्यांनी विभागीय आयुक्त नागपूर यांना तक्रार केली आहे. पंचायत समिती आमगाव अंतर्गत ग्रामपंचायत कट्टीपार व गोसाईटोला येथील विविध कामात ई-निविदेद्वारे साहित्य खरेदी करण्यात आले नाही, असा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.ग्रामपंचायत कट्टीपार येथील जिल्हा परिषद हायस्कूलच्या शाळा दुरुस्ती कामाकरिता ५ लाख रुपयांच्यावर निधीला मंजुरी मिळाली. या कार्यात एक लाख रुपयावरचे साहित्य खरेदीकरिता ई-निविदा काढावी लागते. पण सदर कार्यात ई-निविदा काढण्यात आली नाही, अशी तक्रार विभागीय आयुक्त यांना गावकऱ्यांनी केली आहे. या कार्यात लेंटर भिंत दुरुस्ती, लेंटर ढलाई, व्हरांडा स्लॅप ढलाईपर्यंत कार्य पूर्णत: वास झाले आहे. येथील कामाकिरता साहित्य खरेदी करुन सदर साहित्य शाळेतील पटांगणात पडलेला आहे. यात शाळा व्यवस्थापन समितीची परवानगी न घेता कामे सुरू करण्यात आली आहे. यामुळे शाळेच्या आवारात साहित्य पडून असून त्यांचा विद्यार्थ्यांना त्रास होतो. शाळेतील दुरुस्तीकरिता जिर्ण व खंडीत इमारतीची निवड केली आहे. यामुळे ती दुरुस्ती उपयोगी नाही, असेही तक्रारीत म्हटले आहे. यासंदर्भात शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष यांना विश्वासात न घेता कार्य सुरू करण्यात आले. ग्रामविकास मंत्रालयाच्या निर्णयाचे पालन न करता शाळा दुरुस्तीचे कार्य ५० टक्के पूर्ण करण्यात आले. ग्रामपंचायत गोसाईटोला येथील प्राथमिक शाळा आवारभिंत ५ लाख रुपये नक्षलग्रस्त निधीअंतर्गत मंजुर असून सदर आवार भिंतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. सदर कामाचे साहित्य खरेदीकरिता ई-निविदा न काढता बांधकाम पूर्णत्वास नेले आहे. या दोन्ही ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक महाकाळकर आहेत. यांच्यावर अनेक भ्रष्टाचाराचे आरोप प्रसिद्धीपत्रकात समाज सेवक अशोक राऊत यांनी केले आहे .या प्रकरणी चौकशी करून ग्रामसेवक महाकाळकर यांना निलंबित करण्यात यावे, अशी मागणी समाजसेवक अशोक राऊत यांनी उपकार्यपालन अधिकारी गोंदिया, कार्यकारी अभियंता सा.बां., खंडविकास अधिकारी यांना केली आहे. (वार्ताहर)