शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांगांकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2018 21:34 IST

दिव्यांग बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाने विविध क्षेत्रात आरक्षण दिले आहे. त्याची काटेकोर अंमलबजावणी केल्यास दिव्यांग बांधवांचा आर्थिक, सामाजिक विकास होण्यास मदत होईल. दिव्यांग व्यक्तीकडे पाहण्याचा दृष्टिकोन समाजाने सकारात्मक ठेवावा, असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.

ठळक मुद्देरामदास आठवले : दिव्यांग मेळावा : २३१७ दिव्यांगांना साहित्य वाटप

लोकमत न्यूज नेटवर्कसडक-अर्जुनी : दिव्यांग बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाने विविध क्षेत्रात आरक्षण दिले आहे. त्याची काटेकोर अंमलबजावणी केल्यास दिव्यांग बांधवांचा आर्थिक, सामाजिक विकास होण्यास मदत होईल. दिव्यांग व्यक्तीकडे पाहण्याचा दृष्टिकोन समाजाने सकारात्मक ठेवावा, असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.सामाजिक न्याय विभाग, जिल्हा परिषद, भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम व जिल्हा प्रशासनाच्या वतीने येथील आयटीआय सभागृह येथे आयोजित दिव्यांग व्यक्तींना नि:शुल्क सहाय्य उपकरणे वितरण कार्यक्र मात ते बोलत होते. याप्रसंगी ना. रामदास आठवले व ना. राजकुमार बडोले यांच्या हस्ते दिव्यांग व्यक्तींना प्रातिनिधीक स्वरुपात विविध साहित्याचे वाटप करण्यात आले.या वेळी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजा दयानिधी, अप्पर जिल्हाधिकारी अशोक लटारे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष हमीद अल्ताफ अकबरअली, जि.प.समाज कल्याण समिती सभापती विश्वजीत डोंगरे, महिला व बाल कल्याण समिती सभापती लता दोनाडे, पं.स.सभापती गिरिधर हत्तीमारे, उपसभापती राजेश कठाणे, नगराध्यक्ष देवचंद तरोणे, उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले, प्रादेशिक उपायुक्त डॉ.सिध्दार्थ गायकवाड, सहाय्यक आयुक्त समाजकल्याण मंगेश वानखेडे, समाजकल्याण अधिकारी मिलींद रामटेके, एलिम्को कंपनीचे उपमहाव्यवस्थापक अजय चौधरी व जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्य उपस्थित होते. आठवले म्हणाले, मागील चार वर्षात केंद्र सरकारने देशभरात ७ हजार शिबिर घेवून १० लाख दिव्यांग व्यक्तींना साहित्य वाटप केले.दिव्यांग व्यक्तीकडे पाहण्याचा दृष्टीकोन समाजाने बदलण्याची गरज आहे. दिव्यांगाच्या आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक विकासासाठी सामाजिक न्याय विभाग सातत्याने प्रयत्न करीत आहे. सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांच्या पुढाकाराने आयोजित आजचा साहित्य वाटप कार्यक्रम त्याचाच एक भाग आहे. हे साहित्य वाटप प्रातिनिधीक स्वरु पात असले तरी जिल्ह्यातील एकही दिव्यांग व्यक्ती साहित्यापासून वंचित राहणार नाही, याची खबरदारी घेतली जाईल, अशी ग्वाही त्यांनी या वेळी दिली.दिव्यांग बांधवाच्या विकासासाठी असलेला विविध योजनेतील निधी तीन टक्क्यांवरून पाच टक्के करण्यात आला आहे. झिरो पेंडन्सीअंतर्गत जिल्ह्यातील अपंग बांधवांना शंभर टक्के प्रमाणपत्र वाटप करण्यात आले आहे. दिव्यांग खेळाडूंना थेट नोकरी देण्याचा निर्णय शासन घेत आहे. दिव्यांगासाठी विभागीय स्तरावर सर्व ठिकाणी कौशल्य विकास केंद्र व विशेष आयटीआय स्थापन करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे संजय गांधी निराधार योजनेत दिव्यांगाना सहाशेरु पयांऐवजी हजार रु पये निर्वाह भत्ता देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती बडोले यांनी या वेळी दिली. कायम विना अनुदानित मधील कायम हा शब्द वगळण्यात येणार आहे.दिव्यांग व्यक्तींच्या विकासासाठी महाराष्ट्रात दिव्यांग विकास प्रतिष्ठान स्थापन करण्यात येणार असल्याचेही बडोले यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाजकल्याण अधिकारी मिलिंद रामटेके यांनी केले. उपस्थितांचे स्वागत अंध व दिव्यांग मुलांच्या स्वागतगीताने करण्यात आले.विविध साहित्यांचे वाटपया मेळाव्यात दिव्यांगाना २८ मोटराईज्ड ट्रायिसकल, ६५८ ट्रायिसकल, ३४७ फोल्डींग व्हील चेअर, २० सि.पी.चेअर, ९५४ बैसाखी, ४६३ वाकिंग स्टिक, ११ बेल किट, ९ ब्रेल केन, १०१ स्मार्ट केन, ५०० श्रवणयंत्र, ४४७ एमएसआयडी किट, ३६ रोलेटर, २५ एडीएल किट, १९ डेजी प्लेअर, ३५९ कृत्रिम अंग आदी साहित्याचे वाटप करण्यात आले.अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट कायद्यात कुठलाही बदल नाहीएसटी, एससी अ‍ॅक्ट संशोधनाविरोधात गुरुवारी (दि.६) सवर्णातर्फे भारत बंदचे आवाहन करण्यात आले आहे. याबाबत केंद्रीय सामाजिक व न्यायमंत्री रामदास आठवले यांना विचारले असता, त्यांनी अ‍ॅट्रॉसिटी कायद्यात कुठलाही बदल होणार नसल्याचे सांगितले.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेRajkumar Badoleराजकुमार बडोले