शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
4
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
7
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
8
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
9
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
10
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
11
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
12
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
13
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
14
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
15
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
16
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
17
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
18
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
19
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
20
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
Daily Top 2Weekly Top 5

कलपाथरी,पालेवाडा पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 00:56 IST

तालुक्यातील पाणी पुरवठा योजनांचे काम कासव गतीने सुरू असल्याने कलपाथरी व पालेवाडा येथील महिलांना उन्हाळ्याच्या सुरूवातीलाच पाण्यासाठी दूरवर भटकंती करण्याची पाळी आली आहे. तालुक्यात राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेतंर्गत १०, मुख्यमंत्री पेयजल योजनेतंर्गत ७ अशा एकूण १७ पाणी पुरवठा योजनेची कामे सुरू आहेत.

ठळक मुद्देपाणीपुरवठा योजनांचे काम कासव गतीने : जिल्हा प्रशासन अपयशी

लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : तालुक्यातील पाणी पुरवठा योजनांचे काम कासव गतीने सुरू असल्याने कलपाथरी व पालेवाडा येथील महिलांना उन्हाळ्याच्या सुरूवातीलाच पाण्यासाठी दूरवर भटकंती करण्याची पाळी आली आहे.तालुक्यात राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेतंर्गत १०, मुख्यमंत्री पेयजल योजनेतंर्गत ७ अशा एकूण १७ पाणी पुरवठा योजनेची कामे सुरू आहेत. कलपाथरी, पालेवाडा येथील महिलांना उन्हाळ्याच्या सुरूवातीलाच पाण्यासाठी दूरवर भटकंती करण्याची पाळी आली. भूजल सर्वेक्षण विभागाने जानेवारी महिन्यात केलेल्या गोरेगाव तालुक्याची भूजल १.१२ मीटर ने खाली गेली आहे. तर एप्रिल, मे, जून महिन्यात भूजल पातळी पुन्हा खालावण्याची शक्यता असल्याचे भूजल सर्वेक्षक सचिन खोडे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.मागील वर्षी जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत कमी प्रमाणात पाऊस झाल्याने ५ वर्षाच्या तुलनेत भूजल पातळीत १.१२ मीटरने घट झाली आहे. परिणामी पालेवाडा, कलपाथरी, तुमसर, दवडीपार येथे पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. तर पाणी पुरवठा योजनेची कामे सुध्दा मंद गतीने सुरू असल्याने पाणी टंचाईच्या समस्येत पुन्हा वाढ झाली आहे.कलपाथरीच्या सरपंच सुनंदा डोंगरे यांनी सांगितले की, गावातील १३ बोअरवेल, ४ शासकीय विहिरी असून यापैकी ४ बोअरवेल बंद आहेत. त्यामुळे शाळेतील बोअरवेलवर पहाटेपासूनच पाणी भरण्यासाठी महिलांची रांग लागते. दोन वर्षापूर्वी मुख्यमंत्री पेयजल योजनेचे प्रस्ताव ग्रामपंचायतव्दारे देण्यात आले होते. तर जानेवारी महिन्यात या योजनेची कामे सुरू करण्यात आली.राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनांची बाम्हणी, बाघोली, तिमेझरी, कुºहाडी, खाडीपार, बोडूंदा, मुंडीपार, पाथरी, तुमखेडा बु.,पालेवाडा येथे कामे सुरु करण्यात आले आहेत. तर मुख्यमंत्री पेयजल योजनेची दवडीपार, मुरदोली, पिंडकेपार, शहारवानी, कलपाथरी, पुरगांव, व सोनेगाव येथे कामे सुरु आहेत.राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेची तुमसर, गिधाडी, गोंदेखारी, कमरगाव, सटवा येथे पाणी पुरवठा योजनेची कामे मंजूर आहेत.कडक उन्हाळ्याला सुरूवात होण्यापूर्वी पाणी पुरवठा योजनांची कामे पूर्ण झाल्यास तालुक्यात पाणी टंचाईची तीव्र समस्या निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई