शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

मानेगावात काळविटांचे दर्शन

By admin | Updated: February 3, 2017 01:30 IST

वन्यप्राण्यांत ‘शेड्यूल वन’ मध्ये मोडणाऱ्या काळविटांची संख्या गोंदिया जिल्ह्यात तीन तालुक्यात वाढत आहे.

तयार झाले पर्यटनस्थळ : ग्रामवनासाठी नागरिकांचे प्रयत्ननरेश रहिले   गोंदियावन्यप्राण्यांत ‘शेड्यूल वन’ मध्ये मोडणाऱ्या काळविटांची संख्या गोंदिया जिल्ह्यात तीन तालुक्यात वाढत आहे. आमगाव, गोंदिया व गोरेगाव या तीन तालुक्यांच्या मधातल्या ठिकाणी वास्तव्यास असलेल्या काळविटांची संख्या १५० पेक्षा अधिक आहे. त्यातल्या त्यात मानेगाव परिसरात काळवीट व चितळांची संख्या जास्त आहे. त्यांचे दर्शन पर्यटकांना व्हावे यासाठी मानेगावात निसर्ग पर्यटनस्थळ विकसित करण्यात आले आहे.वन्य जीवांमध्ये आकर्षित करणारा काळविट प्राणी राज्यात अकोला, अहमदनगर, अमरावती, नागपूर व गोंदिया येथे आहे. राज्यातील गोंदिया जिल्हा हा काळविट वन्यप्राण्यासाठी महत्वाचा आहे. येथील माळरान या प्राण्याला आवडते. मात्र जिल्ह्यातील माळरान नष्ट होत असल्याने मोठ्या संख्येत असलेल्या काळविटांचे अस्तित्व धोक्यात येत होते. परंतु वन्यप्रेमी व वनाधिकाऱ्यांच्या सकारात्मक पुढाकाराने माळरानावर कुरण वाढविण्याचे काम सतत सुरू आहे. परिणामी काळविटांची संख्या वाढू लागली आहे. काळविटच्या संवर्धनासाठी वनपरिक्षेत्राधिकारी डी.बी. पवार, क्षेत्र सहाय्यक एल.एस. भुते, वनरक्षक डी.आर. राठोड व नमजूर बी.आर. भेलावे, एन.डी. सोनावाने यांनी विशेष प्रयत्न केले. दिवसेंदिवस वन्यप्राण्यांची संख्या कमी होत आहे. उजाड जंगलाना त्यांचे स्वरूप प्राप्त करून देण्यासाठी जंगलाचे संवर्धन करण्यासाठी वनविभाग प्रयत्न करीत असल्याने मानेगावातील माळरानावर काळविट व चितळांचे सवंर्धन होत आहेत. सन २००४-०५ यावर्षी गोंदिया जिल्ह्यात काळविटांची संख्या २० ते २५ च्या दरम्यान होती. परंतु ती संख्या आता १५० ते १८० च्या घरात गेली आहे. या काळविटांची संख्या वाढत असल्याने आता नागरिकांना व पर्यटकांना त्याचे दर्शन व्हावे यासाठी मानेगावात पर्यटन स्थळ तयार करण्यात आले.काळविट संवर्धनासाठी वनविभागाबरोबर निसर्ग मंडळाने उपक्रम सुरू केला होता. या कार्याला सेवा संस्थेने माळरानावर कुरण निर्माण करण्याचे कार्य मानद वन्यजीव रक्षक सावन बहेकार, मुनेश गौतम, अभिजीत परिहार, शशांक लाडेकर, अंकीत ठाकूर दुष्यंत आकरे, चेतन जसानी, बबलु चुटे, प्रवीण मेंढे, विवेक खरकाटे केल्याने जिल्ह्यात ५ ठिकाणी काळविटांचे अधिवास टिकून आहे. सध्याचे उपवन संरक्षक जितेंद्र रामगावकर याचे उजाड झालेल्या माळरानावर कुरण उभारण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. याशिवाय त्यांच्यासाठी पाण्याची सोय म्हणून बंधारे बनविले. बोअरवेल तयार केले व टाकेही उभारले. सपाट झालेल्या मैदानावर कुरण तयार करून त्यांच्या संवर्धनासाठी पुढाकार घेतला. हालचाली टिपण्यासाठी वॉच टॉवरकाळविटाबरोबर कुरणावर वावरणाऱ्या लांडग्यांचीही संख्या वाढत आहे. काही दिवसांपूर्वी एकही न दिसणाऱ्या लांडग्यांची संख्या आता बरीच झाली आहे. या वन्यप्राण्यांच्या हालचाली टिपण्यासाटी वनविभागाने वॉच टॉवर उभारला आहे. त्या टॉवरवरून त्यांच्यावर नजर ठेवली जाते. चितळ, काळविट, लांडगे, निलगाय यासारखे प्राणी या जंगलात आहेत. त्यांच्यासाठी पिण्याच्या पाण्यासाठी २ सोलर पंप, दोन सिमेंट बंधारे, दोन नैसर्गिक तलाव आहेत.