शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

शेतीच्या रस्त्यासाठी काकाची हत्या

By admin | Updated: July 28, 2014 23:36 IST

शेतीतून जाण्यायेण्याच्या रस्त्याच्या वादातून झालेल्या भांडणात पुतण्याने काकाच्या डोक्यावर काठीने प्रहार करून काकाची हत्या करण्याची घटना तिरोडा तालुक्यातील सेजगाव येथे घडली.

एकोडी : शेतीतून जाण्यायेण्याच्या रस्त्याच्या वादातून झालेल्या भांडणात पुतण्याने काकाच्या डोक्यावर काठीने प्रहार करून काकाची हत्या करण्याची घटना तिरोडा तालुक्यातील सेजगाव येथे घडली. छगन हरी पारधी (५२) असे मृत इसमाचे नाव आहे.सेजगाव येथे बोदा रस्त्यावर रविवारी सायंकाळी हा प्रकार घडला. गंगाझरी पोलिसांनी आरोपी जसवंत नंदराम पारधी याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.आरोपी जसवंत पारधी व छगन पारधी या काका-पुतण्यात परंतु मागिल दोन वर्षापासून संबंध चांगले नव्हते. कोणत्या ना कोणत्या कारणावरुन त्यांचे वाद होत होते. परंतु रविवारी त्यांचा वाद शेतामधून जाण्या येण्याच्या रस्त्यावरुन झाला होता. काही दिवसांपुर्वी जसवंत नंदराम पारधी याने आपल्या शेतात बोवार पद्धतीने धान पेरणी केली व छगन पारधी याला आपल्या शेतात पाणी जाऊ न देण्यास सांगितले. याच गोष्टीवरून छगनने रविवारी ४.३० ते ५ वाजताच्यादरम्यान जसवंतला आपल्या स्वत:च्या शेतामधून जाण्यास मनाई केली.त्यांची प्रथम शब्दिक चकमक झाली व नंतर छगनने आरोपी जसवंत पारधीला बैल हाकलण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तुतारीने मारले. त्याचा पलटवार करत जसवंतने त्याच्या डोक्यावर मोठ्या काठीने (उभारी) वार केला. या घटनेची तक्रार छगन याने स्वत: गंगाझरी पोलिसात जाऊन केली. याचदरम्यान त्याला गोंदिया रुग्णालयात नेत असताना त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी गंगाझरी पोलिसांनी भादंविचे कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास डीवायएसपी दीपक गिऱ्हे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे. (वार्ताहर)