शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

कचारगड ट्रेकिंग दौड स्पर्धेचे बक्षीस वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2018 22:14 IST

आदिवासी बांधवांचे आराध्य दैवत कचारगड येथील यात्रेनिमित्त कचारगड ट्रेकिंग दौड स्पर्धा घेण्यात आली होती. यामध्ये ३००, ४००, ८०० मीटर दौड स्पर्धा व मॅरेथॉन स्पर्धेचा समावेश होता.

लोकमत न्यूज नेटवर्कदरेकसा : आदिवासी बांधवांचे आराध्य दैवत कचारगड येथील यात्रेनिमित्त कचारगड ट्रेकिंग दौड स्पर्धा घेण्यात आली होती. यामध्ये ३००, ४००, ८०० मीटर दौड स्पर्धा व मॅरेथॉन स्पर्धेचा समावेश होता. यात सर्वच स्पर्धेत शासकीय आश्रमशाळेचे विद्यार्थी प्रथम आले होते. या स्पर्धेचे बक्षीस वितरण नुकतेच करण्यात आले.कचारगड ट्रेकिंग दौड स्पर्धेचे आयोजन जिल्हा पोलीस कार्यालयाने केले होते. स्पर्धेत अनेक विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. परंतु शासकीय आश्रमशाळा जमाकुडो येथील विद्यार्थ्यांनी सर्वांना मागे टाकत मुले व मुलींच्या सर्व गटात प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे बक्षीस १० हजार रुपये, ७ हजार ५०० रुपये, ५ हजार रुपयांचे पुरस्कार वितरित करण्यात आले.मुले व मुली गटात शासकीय आश्रमशाळेची वर्षा पंधरे ३०० व ८०० मीटर गटात प्रथम, आलोक पडौती ८०० मीटरमध्ये प्रथम, विजय मडावी ५०० मीटर दौड स्पर्धेत द्वितीय, जयसिंग कुंभरे, रोहिणी तावाडे यांनी ४०० मीटर गटात तृतीय बक्षीस पटकाविले होते. जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून १७ जून रोजी आ. संजय पुराम यांच्या अध्यक्षतेत, राजमाता फुलवादेवी कांगो यांच्या हस्ते व जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शासकीय आश्रमशाळा जमाकुडोच्या विद्यार्थ्यांना रोख बक्षीस व प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.याप्रसंगी आ. पुराम यांनी आदिवासी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावर अशाचप्रकारे खेळामध्ये पुढे नेण्याचे आश्वासन दिले. तसेच माझ्या आदिवासी बांधवांनी जगात नाव कमवावे, यासाठी माझे प्रयत्न असतील, असे मत व्यक्त केले. त्याचप्रमाणे राजमाता फुलवादेवी कांगो यांनी आश्रमशाळेचे विद्यार्थी कुठेही मागे नसल्याचे सांगितले.सदर कार्यक्रम देवरी पोलीस मुख्यालय आवारात घेण्यात आला. त्याप्रसंगी पोलीस उपविभागीय अधिकारी नवले, ठाणेदार बचाव, सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत पवार उपस्थित होते.प्रास्ताविक, संचालन व आभार महिला पोलीस शिपाई मंजुके यांनी केले. शाळेतील सर्व विजयी स्पर्धकांचे मुख्याध्यापक पी.जी. कळंबे, वरिष्ठ शिक्षक कमल कापसे, भोजराज दरवडे, सुजाता मेश्राम, आर.आर. लंजे, डोडी नावाडे, कमलेश बारेवार, सोनेकर, चव्हाण, उरकुडे, उताणे, जांभूळकर, भुस्कुटे, मलखांबे, गाढवे, उमेश औरासे, वंजारी, खोब्रागडे, अधीक्षक रामटेके व अधीक्षिका फुंडे यांनी कौतुक केले.

टॅग्स :Kacharagarh templeकचारगड देवस्थान