शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

कचारगड धनेगाव देवस्थान संस्थेचे बदल अर्ज अखेर रद्द

By admin | Updated: June 9, 2017 01:32 IST

कोणतीही संस्था चालविण्यासाठी कमीतकमी सात किंवा नऊ सदस्य आवश्यक असतात;मात्र पारी कोपार लिंगो मॉ कंकाली देवस्थान कचारगड-

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोणतीही संस्था चालविण्यासाठी कमीतकमी सात किंवा नऊ सदस्य आवश्यक असतात;मात्र पारी कोपार लिंगो मॉ कंकाली देवस्थान कचारगड-धनेगाव देवस्थान या चेरिटेबल संस्थेच्या काही सदस्यांचा मृत्यू झाला, काही पदाधिकाऱ्यांमध्ये मतभेद निर्माण झाले तर काहींनी राजीनामा दिला. तसेच १५ वर्षांपासून कोणताही नवीन सभासद भरण्यात न आल्याने सदस्यसंख्या केवळ दोन झाली. त्यामुळे धर्मादाय आयुक्तांनी सदर संस्थेचे बदल अर्ज अखेर रद्द केले.प्राप्त माहितीनुसार, आदिवासी बांधवाचे आराध्य दैवत कचारगड येथे विकासाकरिता तयार करण्यात आलेली संस्था पारी कोपार लिंगो मॉ कंकाली देवस्थान कचारगड-धनेगाव देवस्थानच्या वतीने २००२ पासून पारी कोपारलिंगो मॉ कंकाली नावाने चेरीटेबल संस्थेचे निर्माण करण्यात आले होते. गावातील श्रद्धाळू देवस्थानात पूजा-अर्चना करीत होते. मात्र संस्थेचे उद्देश न समझल्यामुळे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये मतभेद निर्माण होऊन निवडणूक घेण्यात आली नाही. यातील तीन सदस्य उदेलाल झाडुराम पंधरे (अध्यक्ष), रजाऊ विक्रम उईके (उपाध्यक्ष), कमलकुुमार लखनलाल परते (सदस्य) यांचा मृत्यू झाला. भादुलाल जोधी उईके यांचे मानसिक संतुलन ढासळले असून ते संस्थेत कार्यरत नाहीत. आनंदाबाई गोपालसिंग उईके यांनी सन २०११ मध्ये राजीनामा दिला. तसेच गोपालसिंग तुकाराम उईके संस्थेत काम करण्यास इच्छूक नाही. नत्थुलाल बलीराम उईके यांना पारी कोपार लिंगोच्या मिटींगमध्ये बोलविण्यात येत नाही. या संस्थेत आता मात्र दोन सदस्य नामधारी उरले असून बारेलाल प्रेमलाल वरखडे आपल्याला कोषाध्यक्ष मानतात व संतोष फागुलाल पंधरे सदस्य आहेत. कोणत्याही संस्थेला चालविण्याकरिता कमीत कमी ७ ते ९ सदस्य असणे आवश्यक आहे. पारी कोपारलिंगो मॉ कंकाली नावाने चेरीटेबल संस्थेचे काम नियमित न होत असल्यामुळे आणि १५ वर्षापासून कोणताही नवीन सभासद न भरल्यामुळे धर्मादाय आयुक्तांनी १८ एप्रिल २०१७ रोजी पारी कोपारलिंगो मॉ कंकाली कचारगड संस्थचे क्रमांक (३१४/२०१३) बदल करुन (चेंज रिपोर्ट) अर्ज रद्द केले आहे. गैरअर्जदार नत्थुलाल बलीराम उईके यांच्या वतीने अ‍ॅड.सी.जी. साखरे यांनी बाजू मांडली.