शहरं
Join us  
Trending Stories
1
जर्मनीतील म्युनिक विमानतळावर ड्रोन दिसला, १७ उड्डाणे रद्द; युरोपमध्ये घबराट पसरली
2
पुणे हादरले! टीव्ही बंद करण्यावरुन वाद, बापाची मुलाकडून हत्या; कोथरुडमधील घटना
3
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
4
'युरोपने चिथावणी दिली तर योग्य उत्तर मिळेल,तेल खरेदीबाबत भारत अमेरिकेच्या दबावाला झुकणार नाही';पुतिन यांचा स्पष्ट इशारा
5
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
6
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
7
Kantara Chapter 1: प्रदर्शित होताच अख्खं मार्केट खाल्लं! 'कांतारा चॅप्टर १'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
9
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
10
‘अनैतिकते’मुळे अफगाणमध्ये ब्लॅकआउट! इंटरनेटबंदीमागे तालिबानचा नेमका हेतू काय?
11
तेजीचे दिवस; अर्थव्यवस्थेची मरगळ झटकली, नोकऱ्या आणि गिग कामगारांसाठी 'अच्छे दिन' का?
12
सोने खरेदीची लगीनघाई; दसऱ्याच्या मुहूर्तावर मुंबईतील बाजारात संध्याकाळी तेजी; चांदी फॉर्मात
13
शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने कोट्यवधींचा गंडा, ‘लिंक’पासून सावधान; खात्री करून गुंतवणूक करा
14
विधान भवनातील मारहाण प्रकरण तपासाला स्थगिती; मरिन लाइन्स पोलिसांना उच्च न्यायालयाचे आदेश
15
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
16
संकटात जो घरी बसतो तो कसला आला शिवसैनिक? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
17
संघ मेहनतीला लागलेले भाजप हे विषारी फळच! उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळाव्यात घणाघात
18
मुंबई महापालिकेवर युतीचा भगवा फडकणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नेस्काेच्या सभेत घाेषणा
19
डॉ. जी. जी. पारीख गोवा महामार्गाच्या आंदोलनात खुर्ची टाकून बसले तेव्हा!
20
केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतातील चरबी ठरतेय गंभीर आजारांसाठी आमंत्रण!

ज्योती, नेहा ठरल्या वक्तृत्व करंडकाच्या मानकरी

By admin | Updated: January 8, 2016 02:26 IST

जिल्हास्तरीय स्वच्छता मित्र वक्तृत्व करंडक स्पर्धेत वरिष्ठ महाविद्यालय गटातून सडक-अर्जुनी येथील राजीव गांधी महाविद्यालयाची विद्यार्थिनी ज्योती आसाराम नंदेश्वर ...

गोंदिया : जिल्हास्तरीय स्वच्छता मित्र वक्तृत्व करंडक स्पर्धेत वरिष्ठ महाविद्यालय गटातून सडक-अर्जुनी येथील राजीव गांधी महाविद्यालयाची विद्यार्थिनी ज्योती आसाराम नंदेश्वर तर कनिष्ठ महाविद्यालय गटातून सरस्वती विद्यालय अर्जुनी मोरगावची नेहा भास्कर कापगते प्रथम आली. त्यांची राज्यस्तरीय स्वच्छता मित्र वक्तृत्व करंडक स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. दोन्ही विद्यार्थिनींना प्रत्येकी ११ हजाार रुपयांचे पारितोषिक घोषित करण्यात आले.पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन व जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन जिल्हा परिषद गोंदियातर्फे स्थानिक स्व. वसंतराव नाईक जिल्हा परिषद सभागृहात मंगळवारी (दि.५) स्पर्धा पार पडली. स्पर्धेत जिल्ह्यातील आठ तालुक्यातील २८ विद्यार्थी सहभागी झाले. याच स्पर्धेत वरिष्ठ महाविद्यालय गटातून तिरोडा येथील सी.जे. पटेल महाविद्यालयाची विद्यार्थिनी सुनिता चौधरी द्वितीय तर न.मा.द. महाविद्यालयाची विद्यार्थिनी शीतल मांदाडे तृतीय पुरस्काराची मानकरी ठरली. कनिष्ठ महाविद्यालय गटातून अरुणनगर येथील नूतन कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी चंपा परिमल विश्वास द्वितीय तर देवरी येथील मनोहरभाई पटेल कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी हेमकृष्ण प्रेमलाल पिसदे तृतीय पुरस्काराचा मानकरी ठरला. त्यांना अनुक्रमे सात व पाच हजार रुपयांचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. जिल्हास्तरीय स्वच्छता मित्र वक्ततृव करंडक स्पर्धेतील सर्वच विजेत्या विद्यार्थ्यांचे लवकरच जिल्हा परिषद अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते धनादेश, मानचिन्ह व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात येणार आहे. जिल्हास्तरावर दोन्ही गटातून प्रथम व द्वितीय क्रमांक पटकाविलेल्या विद्यार्थ्यांना शासन निर्णयाप्रमाणे साधन व्यक्तींचा दर्जा बहाल करण्यात आला आहे. सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे जिल्हा परिषद पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आर.ए. देशमुख तथा जिल्हा क्रीडा अधिकारी गिरी, प्रा. डॉ. चंद्रकुमार राहुले, माजी प्राचार्य तथा सामाजिक कार्यकर्ते माणिक गेडाम, विधी विभागाचे विभागप्रमुख अ‍ॅड. सुयोग इंगळे, झामेश ठाकरे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देवून गौरविण्यात आले. संचालन माहिती, शिक्षण व संवाद तज्ज्ञ अतुल गजभिये यांनी केले. कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद पाणी व स्वच्छता विभागाचे अधीक्षक एच.व्ही. गौतम, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक जितेंद्र येरपुडे, शालेय स्वच्छता तज्ज्ञ भागचंद रहांगडाले, क्षमता बांधणी तज्ज्ञ देवानंद बोपचे, समाजशास्त्र तज्ञ दिशा मेश्राम, माहिती, शिक्षण व संवाद तज्ज्ञ राजेश उखळकर, स्वच्छता तज्ज्ञ सूर्यकांत रहमतकर, पाणी गुणवत्ता तज्ज्ञ मुकेश त्रिपाठी, सनियंत्रण व मूल्यमापन तज्ज्ञ विशाल मेश्राम, शोभा फटिंग, मनुष्यबळ विकास तज्ज्ञ तृप्ती साकुरे, वित्त व संपादणूक अधिकारी छाया शहारे, सचिन रोडी, रमेश उदयपुरे यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)