शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

अंशकालीन बेरोजगार कर्मचाऱ्यांची थट्टा

By admin | Updated: July 1, 2014 01:35 IST

चातक पक्ष्याप्रमाणे नोकरीची वाट पाहता-पाहता काही अंशकालीन पदवीधरांचे नोकरी मिळण्याचे वय पार करून गेले आहेत. तरीही शासन दरबारी त्यांच्या मागण्या कचरापेटीतच जमा आहेत.

गोंदिया : चातक पक्ष्याप्रमाणे नोकरीची वाट पाहता-पाहता काही अंशकालीन पदवीधरांचे नोकरी मिळण्याचे वय पार करून गेले आहेत. तरीही शासन दरबारी त्यांच्या मागण्या कचरापेटीतच जमा आहेत.अंशकालीन कर्मचाऱ्यांनी मागण्यांसाठी अनेकवेळा उपोषण, धरणे-आंदोलन केले आहेत. परंतु सरकारकडून आश्वासनाशिवाय पदरात काही दिले नाही. याचाच परिणाम म्हणजे काहींचा मृत्यूही झाला. तिरोडा तालुक्यातील कटरे, सालेकसा येथील पारस नागपुरे, गोरेगाव येथील बाबुलाल पटले हे नोकरीची आशा करीत राहिले व मरणाधीन झाले. परंतु नोकरी मिळू शकली नाही. पदवीधर अंशकालीन कर्मचारी डीएड, बीएड, एमए, एमएड, टंकलेखक, डीफॉर्म असून त्यांच्याकडे ती वर्षे काम केल्याचे अनुभव आहे. त्यामुळे शासनाच्या अनेक विभागात ते जबाबदारीने काम करु शकतात. परंतु याची दखल कोणीही घेतली नाही. राज्य सरकारने सन २००४ व २००६ मध्ये नोकऱ्यांमध्ये त्यांना समाविष्ठ करण्याचे परिपत्रक काढले. न्यायालयानेसुद्धा अंशकालीन कर्मचाऱ्यांच्या बाजूने निकाल दिला. परंतु वाट पाहता-पाहता त्यांनी वयोमर्यादा ओलांडली असून अंशकालीन कर्मचारी आजच्या घडीला हलाखीचे जीवन जगत आहे. आजही अनेक पदवीधर अंशकालीन कर्मचारी बेरोजगार आहेत. वयोमर्यादा ओलांडलेले काहीतरी काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिवाह करीत आहेत. आजच्या काळात ते प्रपंचाचा व मुलांच्या शिक्षणाचा भार सहन करु शकत नाही. तरी शासनाने या अंशकालीन बेरोजगांचे प्रश्न त्वरीत मार्गी लावावे, असे आवाहन संघटनेचे प्रांतीय सचिव व्ही.एम. चौरे यांनी एका निवेदनाद्वारे राज्यसरकारला केले आहे. (वार्ताहर)