शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

समाजात समन्वय घडवून आणण्याचे काम पोलिसांचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:19 IST

गोंदिया : राज्याच्या टोकावर असलेला गोंदिया जिल्हा विकासाच्या मार्गावर झपाट्याने चालत आहे. पोलिसांचे काम अधिक सोयीस्कर व्हावे यासाठी अत्याधुनिक ...

गोंदिया : राज्याच्या टोकावर असलेला गोंदिया जिल्हा विकासाच्या मार्गावर झपाट्याने चालत आहे. पोलिसांचे काम अधिक सोयीस्कर व्हावे यासाठी अत्याधुनिक असलेल्या ६ स्काॅर्पिओ व ४० बोलेरो उपलब्ध करून दिल्या. यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करून जिल्हा पोलिसांना त्यांच्या कामासाठी ही वाहने मदत करतील. पोलीस समाजात समन्वय घडवून आणण्याचे काम करतात. कायदा व सुव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी पोलिसांची भूमिका महत्त्वाची आहे. कोविडच्या कामातही फ्रंटलाइन वर्कर म्हणून काम करताना अनेक पोलिसांचा मृत्यू झाला. तर अनेकांना कोविडचा त्रास सहन करावा लागला. समाजासाठी आणि सुरक्षेसाठी पोलिसांचे महत्त्व अधिक असल्याचे प्रतिपादन खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केले.

जिल्हा नियोजन व विकास निधीतून खरेदी करण्यात आलेल्या ४६ वाहनांच्या पोलीस मुख्यालयात (कारंजा) आयोजित लोकार्पण कार्यक्रमात रविवारी (दि. १८) ते बोलत होते. कार्यक्रमाला जिल्हाधिकारी नयना गुंडे, पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, आ. विनोद अग्रवाल, आ. मनोहर चंद्रिकापुरे, आ. सहेसराम कोरोटे, आ. अभिजित वंजारी, माजी खासदार खुशाल बोपचे, माजी आमदार राजेंद्र जैन, माजी जि.प. अध्यक्ष विजय शिवणकर, गंगाधर परशुरामकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष एन.डी. किरसान, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष मुकेश शिवहरे, अमर वऱ्हाडे, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक बनकर उपस्थित होते. लाल फीत कापून वाहनांचे लोकार्पण करण्यात आले.

प्रास्ताविकातून पोलीस अधीक्षक पानसरे यांनी, आम्हाला कुठे क्राइम घडले याची माहिती मिळाली तर आम्ही ६ ते ७ मिनिटांत घटनास्थळावर पोहोचतो. परंतु ही अत्याधुनिक वाहने मिळाल्याने ५ मिनिटांच्या आत घटनास्थळावर आता पोहोचता येईल, असे सांगितले. संचालन रामनगरचे ठाणेदार प्रमोद घोंगे यांनी केले. आभार पोलीस उपअधीक्षक (गृह) तेजस्विनी कदम यांनी मानले. या वेळी सर्व आमदार व जिल्हाधिकाऱ्यांनीही समयोचित मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला आमगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकूल, गोंदियाचे उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश पांडे, तिराेडाचे नितीन यादव, गोंदिया शहरचे ठाणेदार महेश बनसोडे, ग्रामीणचे ठाणेदार विजय राणे, रावणवाडीचे उमेश पाटील, आमगावचे विलास नाळे, सालेकसाचे प्रमोद बघेले, नक्षलविरोधी अभियानाचे शरद पाटील, श्रीकांत हत्तीमारे उपस्थित होते. या वेळी लिपिक बोपचे यांचा सत्कार करण्यात आला.