शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जिजाऊ आरोग्य व पोषण मिशनचा बट्ट्याबोळ

By admin | Updated: September 9, 2014 23:35 IST

काही वर्षांपासून शासनाच्या वतीने ग्राम बालविकास केंद्र तसेच राजमाता जिजाऊ कुपोषणमुक्त ग्राम अभियान राबविण्यात येत आहे, परंतु सालेकसा तालुक्यात या अभियानाचा फारसा उपयोग न झाल्यामुळे मार्च ते जुलै

नामदेव हटवार - सालेकसाकाही वर्षांपासून शासनाच्या वतीने ग्राम बालविकास केंद्र तसेच राजमाता जिजाऊ कुपोषणमुक्त ग्राम अभियान राबविण्यात येत आहे, परंतु सालेकसा तालुक्यात या अभियानाचा फारसा उपयोग न झाल्यामुळे मार्च ते जुलै २०१४ मध्ये प्रत्येक महिन्यात जवळपास १ हजार ते १२०० पर्यंत कमी वजनाची बालके दिसून येत आहेत. यावरुन एकात्मिक बाल व महिला प्रकल्प कार्यालयातील कर्मचारी वर्गाकडून योग्य नियोजन व काम होत नसल्याचे दिसून येत आहे. सालेकसा तालुक्यात प्रत्येक महिन्यात कुपोषणाची स्थिती आढळून आलेली आहे. जुलै महिन्यात ० ते ६ वर्ष वयोगटातील ८०१७ बालकांपैकी ६७४९ बालके साधारण श्रेणीत होती. ९५५ बालके कमी वजनाची तर १८७ बालके ही तीव्र कुपोषीत होती. तालुक्यातील सर्वच बिटमध्ये कमी वजनाची बालके भरपूर प्रमाणात आढळून येत आहेत. काही बिटांचा सर्वे केला असता ही बाब प्रकर्षाने दिसून आली. शासनाने महाराष्ट्राची भावी पिढी सुदृढ, निरोगी व बुद्धीवान होण्यासाठी व राज्यातील कुपोषन निर्मुलनासाठी विविध मार्गानी प्रयत्न चालविले असूनही अजून लोकांना पहिल्या २ वर्षातील आहाराचे महत्व कळलेले नाही. त्यामुळे कुपोषणाची समस्या अजुनही कायम आहे. त्यात मुख्यालयात पर्यवेक्षिका राहत नसून बाहेरील गावावरुन ये-जा करीत असल्यामुळे पाहिजे त्या प्रमाणात अंगणवाडीला भेट देणे बालकांची माहिती घेणे जास्त प्रमाणात हात नाही. महिन्याची आकडेवाडी जमा करणे व ती कार्यालयात जमा करणे ही बाब आज नित्यनेमाने सुरु असते. याचाही परिणाम तीव्र कुपोषणावर होऊ शकतो.कुपोषणमुक्त अभियान राबवित असताना प्रत्येक प्रकल्पात सर्वात उत्कृष्ट काम करणाऱ्या फक्त ३ अंगणवाड्यांना पुरस्कार देण्याचे काम राजमाता जिजाऊ कुपोषणमुक्त ग्राम अभियानात करण्यात आले होते. पण सालेकसा तालुक्यातील एकही अंगणवाडी मात्र ठरलेली नाही. कुपोषणमुक्त करण्यासाठी राजमाता जिजाऊ आरोग्य व पोषण अभियानात जे विविध उपक्रम राबविण्यासाठी ज्या सूचना देण्यात आल्यात त्याचा उपयोग महिला व बाल प्रकल्प कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून, पर्यवेक्षिकाकडून होत नसल्याचे दिसून येत आहे. परिणामी महिलांमध्ये जी जनजागृती व्हायला पाहिजे ती झालेलीच नाही. अंगणवाडी सेविका व मदतगीस आपल्या स्तरावर स्थानिक पातळीवर राहत नाही. त्यामुळे त्यांचा प्रभाव तेवढा पडत नाही.