शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

जलयुक्त शिवार अभियानाची गती मंदावली

By admin | Updated: February 22, 2017 00:18 IST

दुष्काळाचा सामना करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या जलयुक्त शिवार अभियानाची कामे यावर्षी काहीशी संथगतीने होत आहेत.

दोन महिन्यांत फक्त १६ कामे : आतापर्यंत ४३.०१ टक्के कामांचा कार्यारंभ आदेश गोंदिया : दुष्काळाचा सामना करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या जलयुक्त शिवार अभियानाची कामे यावर्षी काहीशी संथगतीने होत आहेत. सन २०१५-१६ या वर्षात कामांना गती होती. त्यामुळे या अभियानातून चांगल्या गोष्टी समोर आल्या होत्या. पहिल्या वर्षात असलेले उद्दीष्ट पूर्ण करण्यात आले होते. परंतु सन २०१६-१७ या वर्षातील उद्दीष्ट साध्य करणे अशक्य होणार आहे. आतापर्यंत ४३.०३ टक्के कामांचे कार्यारंभ आदेश काढण्यात आले आहेत. ९.७८ टक्के कामे पूर्ण झाली आहेत. जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात (सन २०१६-१७) मध्ये जिल्ह्यातील ७७ गावांमध्ये २ हजार ७४८ कामांचे सुधारित प्रारुप तयार करण्यात आले. यातील २ हजार ६१६ कामांवर खर्च होणारा बजेट तयार करण्यात आला. २ हजार ५९१ कामांना प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. यातील १ हजार १८२ कामे आतापर्यंत सुरू करण्याचे आदेश दिले. परंतु फक्त ८०५ कामे सुरु करण्यात आले आहे. २६९ कामे पूर्ण झाले आहेत. यात कृषी विभागाचे २०, जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागाचे १५, पंचायत समितीचे २२ व लघु पाटबंधारे विभाग (पाणी) चे ९८ कामे प्रगती पथावर आहेत. (तालुका प्रतिनिधी) पावसाच्या पाण्याने भूगर्भ स्तर वाढवा जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानातून काम झाले आहेत. ज्या तालुक्यात ही कामे झाली. त्या तालुक्यात पाण्याची पातळी उंचावर आहे. त्या तालुक्यातील सिंचन क्षेत्रात वाढ झाली आहे. परंतु अनेक तालुक्यातील पाण्याची पातळी खाली आहे. जलयुक्त शिवार अभियानाबरोबरच पावसाचे पाणी जमीनित मुरावे यासाठी प्रयत्न केल्याशिवाय भुजल पातळी वाढणार नाही. ७८९६.८८ लाखांचा बजेट जलयुक्त शिवार अभियानाचा सुधारित अहवाल तयार करण्यात आला असून कृषी विभागाच्या १ हजार ८४९ कामांवर ३५ कोटी ३५ लाख ३५ हजार, जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाच्या २१२ कामांवर २३ कोटी १३ लाख ७३ हजार, जलसंधारणाच्या ३१ कामांवर ५९ लाख ८० हजार, वनविभागाच्या ५०२ कामांवर १० कोटी १० लाख ७९ हजार तर पंचायत समितीच्या १५८ कामांवर ४ कोटी ७७ लाख २१ हजार रुपये खर्च करण्यात येणार आहेत.