शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

जीर्ण बांधकामांचा रेकॉर्डच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2017 21:10 IST

शहरातील जीर्ण बांधकामाची अद्ययावत स्थिती व त्यावर उपाययोजना करून जीवीतहानी होणार नाही, याची दक्षता घेणे नगर परिषद प्रशासनाची जबाबदारी आहे.

ठळक मुद्देनगर रचना विभागाचे दुर्लक्ष: पालिका प्रशासनालाही घेणे-देणे नाही

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहरातील जीर्ण बांधकामाची अद्ययावत स्थिती व त्यावर उपाययोजना करून जीवीतहानी होणार नाही, याची दक्षता घेणे नगर परिषद प्रशासनाची जबाबदारी आहे. येथे मात्र उलट कारभार सुरू आहे. नगर परिषद प्रशासनाला याचे काहीच घेणे-देणे नसून नगर रचना विभागाचेही सपशेल दुर्लक्ष आहे. विशेष म्हणजे नगर रचना विभागाकडे शहरातील जीर्ण बांधकामांचा रेकॉर्डच नसल्याची माहिती आहे.एखादी इमारत पडून जीवीतहानी झाल्याच्या बातम्या वृत्तपत्रात व टिव्हीवर बघावयास मिळतात. यात विशेष म्हणजे अशाप्रकारच्या घटना पावसाळ््यात जास्त प्रमाणात घडतात. शहरातही असे काहीसे प्रकार घडले आहेत. असे प्रकार घडू नये व जीर्ण इमारती पडून कुणाचा जीव जाऊ नये याची जबाबदारी नगर परिषद प्रशासनावर असते. मिळालेल्या माहितीनुसार, नगर परिषदेला यासाठी विभाग निहाय पथक तयार करून जीर्ण इमारतींची माहिती संकलीत करावयाची असते. तसेच अशा मालमत्ताधारकांना नोटीस बजाविण्याचे, शिवाय गरज पडल्यास धोकादायक बांधकाम पाडण्याची कारवाई करावी लागते.विशेष म्हणजे यासाठी नगर रचना विभागाकडे तसे काही अधिकार देण्यात आले आहेत. येथील नगर परिषदेत मात्र गंगा उलट्या दिशेने वाहत असल्याचे दिसून येत आहे. येथील नगर रचना विभागाक डे अशा जीर्ण बांधकामांबाबत माहितीच नसून तसा रेकॉर्डच उपलब्ध नाही. पावसाळ््यात सर्वेक्षणकरून अशा बांधकामांची नोंद करून त्यांच्यावर कारवाई करण्याची तसदी घेण्याचे काम करण्यास कुणीही इच्छूक नाही. अशात मात्र एखादी अप्रिय घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.विशेष म्हणजे, सध्या नगर रचना विभागातील नगर रचानाकार नकाशे यांची बदली झाल्याने त्यांचे पद रिक्त पडून आहे. अशात या विभागात जबाबदार अधिकारीच नसल्याने कोण डोकेदुखी लावून घेणार अशी स्थिती आहे असे म्हणता येईल. तर यापूर्वी बांधकाम विभागाकडून जीर्ण इमारतींचे सर्वेक्षण केले जात असल्याची माहिती आहे. मात्र ही प्रथा मागील कित्येक वर्षांपासून गोंदिया नगर परिषदेत बंद पडल्याची माहिती आहे.एकमेकांकडे बोट दाखविणेजिर्ण इमारतींचा रेकॉर्ड कोण तयार करतो या विषयाला घेऊन नगर परिषदेत एकमेकांकडे बोट दाखविण्याचे काम सुरू आहे. नगर रचना विभागाला विचारणा केली असता ते एसेसमेंंट विभागाचे नाव सांगतात. एसेसमेंट विभागाकडे विचारणा केली असता ते बांधकाम विभागाकडे बोट दाखवितात. यावरून जिर्ण इमारतींचा लेखा-जोखा ठेवण्याची जबाबदारी कुणीही घेण्यास तयार नसल्याचे दिसते. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार सुरू असताना अधिकारी व पदाधिकारीही गप्प बसून आहेत.फक्त तक्रारींची नोंदयेथील नगर रचना विभागाकडे आलेल्या तक्रारींची नोंद करण्यात येते. तसेच आलेल्या तक्रारीवरून संबंधीत घर मालकाला नोटीस धाडली जाते. याशिवाय अन्य कोणतीही यादी किंवा रेकॉर्ड त्यांच्याकडे नाही. यातून विभागाकडे आलेल्या तक्रारींवर संबंधीताला नोटीस बजावण्या इतपत कामच केले जात असल्याचे म्हणणे वावगे ठरणार नाही. त्यातही यंदा एकही नोटीस धाडण्यात आले नसल्याचे विभागातील कर्मचाºयाकडून कळले.