शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

‘जय श्रीराम’च्या गजराने दुमदुमली तिरोडा नगरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2016 01:41 IST

श्रीराम नवमी शोभायात्रा नगर उत्सव समितीच्यावतीने शहरात शुक्रवारी (दि.१६) शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते.

विविध देखावे : धार्मिक व सामाजिक संघटनांचा सहभागतिरोडा : श्रीराम नवमी शोभायात्रा नगर उत्सव समितीच्यावतीने शहरात शुक्रवारी (दि.१६) शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या शोभायात्रेची सुरुवात स्थानिक गजानन मंदिरातून करण्यात आली. शोभायात्रेत विविध देखावे, चित्ररथ तसेच डी.जे.ची व्यस्था करण्यात आली होती. चित्ररथांमध्ये महाकालेश्वर भष्मआरतीचे चित्ररथ सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. तसेच दुर्गा वाहिणीच्या वतीने स्त्री शक्तीचे प्रदर्शन करण्यात आले. त्यात मुलींना पी.टी. उषा, कल्पना चावला, सावित्रीबाई फुले, दुर्गा, काली, मदर टेरेसा अशा विविध स्त्री शक्तीचे प्रदर्शन करण्यात आले होते. भगवान परशुरामद्वारा मॉ ंरेणुकावर प्रहार, श्रावणबाळ आई-वडीलांची कावड घेवून तिर्थयात्रेस निघाला, गजानन महाराज यांच्या समोर क्रोधीत झालेली गाय शंत होतो तो चित्ररथ प्रसंग, तुळजापूरची भवानी देवीचे चित्ररथ आकर्षक होते. एकापेक्षा एक मनोविलोभनीय चित्ररथांची शोभायात्रा बघण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. शोभायात्रा जाणाऱ्या रस्त्याने पाणी टाकून घरासमोर रांगोळ्या काढून शोभायात्रा व पालखीचे स्वागत घरोघरी होत होते. गजानन मंदिरातून सुरू होऊन शहराच्या मुख्य मार्गाने, सपना फॅशन, न.प. बगीचा, कहार मोहल्ला, जुनी बस्ती, ठाकूर मोहल्ला, गुरुदेव चौक, मोहनलाल चौक, पोलीस स्थानक, मुख्य चौक मार्गे गजानन मंदिर असा मार्ग क्रमण करीत शोभायात्रेचा समारोप गजानन मंदिरात करण्यात आला. या शोभायात्रेदरम्यान स्वर्णकार सखी मंच तिरोडाच्यावतीने शेवचिवडा, मिसळचे पाकिट वितरण केले. ठाकूर मोहल्ला येथे अल्पाहाराचे वितरण, देवाजी निवडे यांचेतर्फे सरबतचे वितरण, बजरंग दल तिरोडा शाखेतर्फे आलूपोहा तसेच विविध सामाजिक संघटना व वैयक्तीकरित्या सुद्धा सरबत, नास्ता, फळांचे वितरण जागोजागी करण्यात आले होते.शोभायात्रेत उत्स्फूर्त उत्साह दिसून येत होता तर डी.जे. वर रामधून, रामजी की निकली सवारी, जय श्रीराम च्या गजरावर तरुण नाचतगात होते. पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता. कुठेही अनुचित घटना घडली नाही. यावर्षी समितीच्या वतीने बाहेरुन सुद्धा झॉकी, चित्ररथ बोलविले होते. ते पाहण्यासाठी लोकांची गर्दी वाढलेली दिसून आली. (तालुुका प्रतिनिधी)