शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

जय श्रीराम व जय झुलेलालचा गजर

By admin | Updated: April 10, 2016 02:06 IST

विश्व हिंदू परिषद व बजरंग दलच्यावतीने रामाच्या नवरात्रीनिमित्त शहरात काढण्यात आलेल्या शोभायात्रेत ‘जय श्रीराम’चा गजर

शहरात निघाली भव्य शोभायात्रा : शहरवासीयांनी केले जंगी स्वागत गोंदिया : विश्व हिंदू परिषद व बजरंग दलच्यावतीने रामाच्या नवरात्रीनिमित्त शहरात काढण्यात आलेल्या शोभायात्रेत ‘जय श्रीराम’चा गजर तर सिंधी समाजाचे आद्य दैवत साई झुलेलाल यांच्या जयंतीनिमित्त निघालेल्या शोभायात्रेतील ‘जय झुलेलाल’च्या गजराने गोंदिया नगरी दुमदुमून गेली होती. येथील सिव्हील लाईन्स हनुमान चौकातून प्रभू रामचंद्रांची तर सिंधी कॉलनीतून साई झुलेलाल यांची शोभायात्रा निघाली होती. मराठी नववर्षाला शुक्रवारपासून प्रारंभ झाला असून चैत्र नवरात्रोत्सवाला ही प्रारंभ झाला. हे नवरात्र रामाचे नवरात्रही असल्याने बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेच्यावतीने दरवर्षी शहरात रॅली काढली जाते. तसेच शहरातील नेहरू चौकात प्रभू रामचंद्रांच्या मुर्तीची स्थापना करून नऊ दिवस पूजा-अर्चना केली जाते. त्यानुसार यंदाही येथील सिव्हील लाईन्स हनुमान चौकातून प्रभू रामचंद्रांची शोभायात्रा काढण्यात आली. शहरातील मुख्य मार्गाने निघालेल्या या शोभायात्रेत मोठ्या संख्येत बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. ‘जय श्रीराम’चा जयघोष करीत निघालेल्या या शोभायात्रेने शहर दुमदुमून गेले होते. त्याचप्रकारे सिंधी समाजाचे आद्य दैवत साई झुलेलाल यांचा जयंती दिवस व नववर्ष असल्याने सिंधी समाजाचीही शहरात शोभायात्रा निघाली होती. हजारोंच्या संख्येत सिंधीबांधवांच्या उपस्थितीत निघालेल्या या शोभायात्रेतील आकर्षक झाकींनी मन मोहून घेतले होते. सिंधी कॉलनीतून ढोल ताशांच्या गजरात नाचत गात निघालेली ही शोभायात्रा शहरातील मुख्य मार्गाने गेली. शोभायात्रेत ‘आयो लाल झुलेलाल’चा गजर करीत सिंधी बांधवांनी एकमेकांना नववर्ष साई झुलेलाल यांच्या जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. एकंदर शहर जय श्रीराम व जय झुलेलालच्या गजराने दणाणून गेला होता. (शहर प्रतिनिधी)