शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

इटखेडा प्रकरण ‘एलसीबी’कडे

By admin | Updated: September 30, 2016 01:51 IST

इटखेडा येथील ओमप्रकाश दशरथ लांजेवार यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी गुरुवारी (२९) आणखी दोन आरोपींना संशयावरुन अटक करण्यात आली.

आणखी तीन संशयितांना अटक : ६ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीअर्जुनी मोरगाव : इटखेडा येथील ओमप्रकाश दशरथ लांजेवार यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी गुरुवारी (२९) आणखी दोन आरोपींना संशयावरुन अटक करण्यात आली. यामुळे संशयित आरोपींची संख्या सहा झाली आहे. त्यांना ६ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली. दरम्यान नागरिकांचा अर्जुनीच्या तपास यंत्रणेवरील अविश्वास पाहता या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखा गोंदिया यांचेकडे देण्यात आला आहे.ओमप्रकाश हा रविवारी रात्रीपासून गायब होता. सोमवारी सायंकाळी ७.३० च्या सुमारास त्याचा मृतदेह इडियाडोह धरणाच्या घाटी पळसगाव कालव्यातील पुलाजवळ पाण्यात तरंगताना आढळून आला होता. अर्जुनी मोरगाव पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करुन स्थानिक ग्रामीण रुग्णालयात मृतदेह उत्तरीत तपासणीसाठी पाठविला. मात्र हा पाण्यात बुडून मृत्यू नसून खून केल्याचा आरोप भाऊ देवराम व गावकऱ्यांनी केला होता. संशयितांवर गुन्हा दाखल करुन अटक करण्यासाठी ग्रामस्थांनी बुधवारी (ता.२८) मृतदेहासह पोलीस ठाण्यात धडक दिली. स्थानिक महाराणा प्रताप चौकात टायर जाळून रास्ता रोको आंदोलन केले होते. संतप्त जमावाची बाजू ऐकून उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी मान्य केली. अखेर बुधवारी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला व मृतदेह फेरउत्तरीय तपासणीसाठी नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठविला. बुधवारी सायंकाळी संशयित म्हणून मृतकाची पत्नी रंजना ओमप्रकाश लांजेवार (३२), सासरे (रंजनाचे वडील) रामकृष्ण उर्फ बंडू फत्तूजी तलमले (५५), अडयाळ व शरद गुलाबराव मोहरकर (३३) रा.खमारी कुटी यांना अटक करण्यात आली.गोंदिया स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक जयराज रन्नवरे यांनी तपासाची सुत्रे हाती घेतली. गुरुवारी (२९) पहाटे निताराम उर्फ मिताराम बाबूराव लांजेवार (२५) या संशयितास इटखेडा येथील त्याच्या निवास्थानावरुन अटक केली. भोजराज रामकृष्ण तलमले (२३) रा.अडयाळ व नरेश रामकृष्ण तलमले (२१) रा.अडयाळ यांना अटक करुन न्यायालयात हजर करण्यात आले. संशयित आरोपींना ६ आॅक्टोबरपर्यंत (८ दिवसांची) पोलीस कोठडी सुनावण्यात आली. (तालुका प्रतिनिधी)