शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

रबी धान खरेदीचा मार्ग होणार सुकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:30 IST

गोंदिया : जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाने खरेदी केलेल्या धानाची उचल करून भरडाई करण्यास राईस मिलर्स असोसिएशनच्या ...

गोंदिया : जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाने खरेदी केलेल्या धानाची उचल करून भरडाई करण्यास राईस मिलर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी (दि.७) झालेल्या बैठकीत सकारात्मकता दाखविली. त्यामुळे रबी हंगामातील धान खरेदीचा मार्ग सुरू सुकर झाला आहे.

जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाने या दोन्ही विभागांनी खरेदी केलेल्या धानाची अद्यापही उचल झाली नाही. परिणामी, लाखो क्विंटल धान उघड्यावर पडला आहे. हा धान तसाच पडून राहिल्यास मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बऱ्याच प्रमाणात धान गोदामात पडून असल्याने रबी हंगामातील धान खरेदीची अडचण निर्माण झाली आहे. हीच बाब लक्षात घेत यावर तोडगा काढण्यासंदर्भात खा. प्रफुल्ल पटेल यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, अन्न व नागरी पुरवठा विभागाचे सचिव विलास पाटील यांच्याशी चर्चा केली होती. तसेच यावर त्वरित तोडगा काढण्याची मागणी केली होती. त्यानंतर पुरवठा विभागाचे सचिव विलास पाटील हे शुक्रवारी गोंदिया येथे आले होते. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात संबंधित विभागाचे अधिकारी आणि राईस मिलर्स असोसिएशनचे पदाधिकारी यांच्यासह चर्चा केली. यावेळी राईस मिलर्सने सकारात्मकता दाखविल्याने आता धानाच्या भरडाईचा मार्ग मोकळा होणार आहे. या बैठकीत आ. मनाेहर चंद्रिकापुरे व माजी आ. राजेंद्र जैन यांनी खरिपातील धानाची त्वरित उचल करून रबी हंगामातील धान खरेदी त्वरित सुरू करण्याची मागणी पुरवठा विभागाचे सचिव विलास पाटील यांच्याकडे केली. त्यांनी सुद्धा धान खरेदी त्वरित सुरू करण्याचे आश्वासन दिले. धान खरेदी आणि भरडाईच्या प्रश्नावर खा. प्रफुल्ल पटेल यांचा शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. यापूर्वी त्यांनी याच विषयावर मुंबई येथे बैठक घेतली. त्यानंतर शुक्रवारी नाशिक येथील आदिवासी विकास महामंडळाचे अधिकारी गोंदिया येथे पोहोचले होते. त्यांनी सुद्धा धान खरेदीवर सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. बैठकीला जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

.......

खासगी गोदाम भाड्याने घ्या

खरीप हंगामात खरेदी केलेला ५० लाख क्विंटल धान तसाच गोदामांमध्ये पडून आहे. त्यामुळे रबीची धान खरेदी करण्याची अडचण जात आहे. त्यामुळे या धानाची साठवणूक करण्यासाठी खासगी गोदाम भाड्याने घेऊन उचल करण्यात यावी, अशी मागणी आ. मनाेहर चंद्रिकापुरे व माजी आ. राजेंद्र जैन यांनी अन्न व नागरी पुरवठा विभागाचे सचिव पाटील यांच्याकडे केली.