शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

कळते पण वळत नाही

By admin | Updated: January 14, 2015 23:09 IST

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाची परवानगी न घेता विद्यार्थ्यांची आॅटो आणि इतर वाहनांमधून सर्रास दिवसाढवळ्या नियमबाह्यपणे वाहतूक केली जाते. अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना त्या वाहनांमधून

धोकादायक वाहतूक सुरूच : रस्ता सुरक्षा सप्ताहातही कोणतीच कारवाई नाहीगोंदिया : उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाची परवानगी न घेता विद्यार्थ्यांची आॅटो आणि इतर वाहनांमधून सर्रास दिवसाढवळ्या नियमबाह्यपणे वाहतूक केली जाते. अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना त्या वाहनांमधून नेणे कायद्याने गुन्हा असल्याचे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे अधिकारी म्हणतात, मात्र त्या वाहनांवर ना परिवहन विभाग कारवाई करीत, ना वाहतूक नियंत्रण विभाग. एवढेच नाही तर विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर हजारो रुपये खर्च करणारे पालकही या बाबतीत बिनधास्त कसे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.लोकमतने बुधवारी ‘विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात’ या मथळ्याखाली प्रकाशित केलेल्या बातमीने उपप्रादेशिक परिवहन विभाग खळबडूून जागा झाला. परवानगी न घेता आॅटोमधून विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या आॅटो चालकांवर कारवाई केल्याचे त्यांनी आज (दि.१४) सांगितले. मात्र किती वाहनांवर अशी कारवाई झाली याची आकडेवारी ते देऊ शकले नाही.परवानगी न घेता आॅटोमधून विद्यार्थ्यांची वाहतूक होत असेल तर हे चुकीचे आहे. असुरक्षितरित्या विद्यार्थ्यांची वाहतूक करणे धोक्याचे आहे. पालक वर्ग हजारो रूपये खर्च करून आपल्या मुलांना चांगले शिक्षण देण्यासाठी गोंदियातील चांगल्या शाळांमध्ये पाठवितात. एका विद्यार्थ्यावर वर्षाकाठी ४० हजार रूपये खर्च करणारे पालक आपल्या पाल्यांचा जीव धोक्यात टाकून खुल्या आॅटोतून त्यांची वाहतूक करण्यास तयार असतात. अनेक शाळातील विद्यार्थ्यांना खासगी आॅटोतून ने-आण केली जाते असल्याचे चित्र आहे. हा प्रकार राजरोसपणे सुरू असताना उपप्रादेशिक परिवहन विभाग आणि वाहतूक नियंत्रण शाखेने या आॅटोंना अभयदान दिले आहे. त्यांच्यावर अद्याप कारवाई केली नाही. जेव्हा- जेव्हा हे आॅटो त्यांच्यासमोर आले तर क्वचितच कारवाई केली जाते. परंतु विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी प्रशासन किती तत्पर आहे यावर नजर टाकल्यास संबधित विभाग त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येते. (तालुका प्रतिनिधी)