शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे स्थानकावर पाठवायला जाणेही महाग, प्लॅटफार्म तिकीट ५० तर पार्किंग ३० रुपये!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 05:00 IST

दुचाकी वाहने ठेवण्यासाठी २४ तासांचे ३० रुपये चारचाकी वाहनांसाठी ६० रुपये शुल्क आकारले जात आहेत. रेल्वे बोर्डाच्या सूचनेनुसार कोरोनाचा संसर्ग लक्षात घेऊन रेल्वेस्थानकावरील गर्दी टाळण्यासाठी प्लॅटफार्म तिकिटाचे दर ५० रुपये करण्यात आले होते. मात्र हे दर कमी करण्यासंदर्भात अद्याप कुठल्या सूचना प्राप्त झाल्या नसल्याने तेच दर कायम ठेवण्यात आले आहे.

अंकुश गुंडावारलोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :  कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता रेल्वेस्थानकावरील होणारी गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे विभागाने यंदा फेब्रुवारी महिन्यात प्लॅटफार्म तिकिटाचे दर १० रुपयांवरून ५० रुपये केले. आता संसर्ग आटोक्यात आला असून परिस्थिती पूर्वपदावर आली आहे. मात्र अद्यापही प्लॅटफार्म तिकिटाचे दर कमी केले नाही. त्यामुळे रेल्वे स्थानकावर नातेवाईक किंवा मित्राला सोडायला जाणाऱ्यांना रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वारावरूनच परतावे लागत आहे. हावडा-मुंबई मार्गावरील गोंदिया रेल्वेस्थानक हे एक महत्त्वपूर्ण रेल्वेस्थानक असून या रेल्वे स्थानकावरून दररोज २५ हजारावर प्रवासी ये-जा करतात. लाॅकडाऊनपूर्वी या रेल्वे स्थानकावरून दररोज ४०० ते ५०० प्लॅटफार्म तिकिटांची विक्री होत होती. आता ती दीडशे ते दोनशेच्या आसपास आहे. तिकिटांचे दर कमी न केल्याने प्रवाशांमध्ये रोष व्याप्त आहे. 

प्लॅटफार्म तिकीटातून रेल्वेची  कमाई 

कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता रेल्वे विभागाने रेल्वे स्थानकावरील गर्दी कमी करण्यासाठी प्लॅटफार्म तिकीटात फेब्रुवारी महिन्यापासून वाढ केली आहे. गोंदिया रेल्वे स्थानकावरुन दरराेज दीडशे प्लॅटफार्म तिकीटाची विक्री होत असून यातून रेल्वे स्थानकाला मागील सहा महिन्यात जवळपास सात ते आठ लाख रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. प्लॅटफार्म तिकीट विक्रीमुळे रेल्वेच्या उत्पन्नात चांगली वाढ झाली आहे. 

पार्किंगही महाग रेल्वेस्थानक परिसरात पार्किंग वाहन करण्यासाठीच्या दरात सातत्याने वाढ केली जात आहे. दुचाकी वाहने ठेवण्यासाठी २४ तासांचे ३० रुपये चारचाकी वाहनांसाठी ६० रुपये शुल्क आकारले जात आहेत. पार्किंगचे कंत्राट देण्यात आले असून पार्किंगच्या शुल्कात दरवर्षी वाढ केली जात असल्याने याचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. 

रेल्वे बोर्डाच्या सूचनेनुसार कोरोनाचा संसर्ग लक्षात घेऊन रेल्वेस्थानकावरील गर्दी टाळण्यासाठी प्लॅटफार्म तिकिटाचे दर ५० रुपये करण्यात आले होते. मात्र हे दर कमी करण्यासंदर्भात अद्याप कुठल्या सूचना प्राप्त झाल्या नसल्याने तेच दर कायम ठेवण्यात आले आहे.- जनसंपर्क अधिकारी

गावी जाऊन सोडणे परवडले

रेल्वे विभागाने प्लॅटफार्म तिकिटाचे दर ५० रुपये केले असून एवढे पैसे भरून चंद्रपूर रेल्वे गाडीने प्रवास करता येतो. प्लॅटफार्म तिकीट काढण्यापेक्षा नातेवाइकाला जाऊन सोडणे परवडेल. - विनय शहारे, प्रवासी

कोरोना संसर्गाच्या नावावर रेल्वे प्लॅटफार्म तिकिटाचे दर वाढविले होते. पण आता सर्व सुरळीत झाले असतानासुद्धा हे दर कमी केले नाही. त्यामुळे आम्हाला भुर्दंड सहन करावा लागत आहे.  - संतोष वाढई, प्रवासी

 

टॅग्स :railwayरेल्वे