शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

विरोधकांकडे प्रश्न नसल्याने ईव्हीएमचा मुद्दा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 21:44 IST

राज्यात मागील पाच वर्षांत पूर्वीच्या सरकारपेक्षा आमच्या सरकारने दुप्पट काम करुन सुद्धा काही प्रश्न मार्गी लावणे शिल्लक आहे. त्यामुळे ते कसे सोडविता येतील याचा विचार आम्ही करीत आहोत. विरोधकांकडे सध्या कुठलेच मुद्दे नसल्याने ते ईव्हीएमचा मुद्दा पुढे करुन जनतेची दिशाभूल करीत आहे. मात्र हा प्रकार कव्हर फायरिंग करण्यासारखा असल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (दि.४) गोंदिया येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली.

ठळक मुद्देदेवेंद्र फडणवीस : पाच वर्षांत सर्वाधिक विकास कामे झाल्याचा दावा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : राज्यात मागील पाच वर्षांत पूर्वीच्या सरकारपेक्षा आमच्या सरकारने दुप्पट काम करुन सुद्धा काही प्रश्न मार्गी लावणे शिल्लक आहे. त्यामुळे ते कसे सोडविता येतील याचा विचार आम्ही करीत आहोत. विरोधकांकडे सध्या कुठलेच मुद्दे नसल्याने ते ईव्हीएमचा मुद्दा पुढे करुन जनतेची दिशाभूल करीत आहे. मात्र हा प्रकार कव्हर फायरिंग करण्यासारखा असल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (दि.४) गोंदिया येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली.पत्रकार परिषदेला पालकमंत्री डॉ.परिणय फुके, खा.सुनील मेंढे, आ.राजकुमार बडोले, विजय रहांगडाले, संजय पुराम, नगराध्यक्ष अशोक इंगळे, माजी आ.रमेश कुथे, भाजप जिल्हाध्यक्ष हेमंत पटले, माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, लोकशाहीत विरोधी पक्ष असला पाहिजे आणि त्यांनी जनतेचे प्रश्न उचलून धरले पाहिजे ही आपली देखील भूमिका आहे. मात्र विरोधकांकडे कुठलेच मुद्दे नसल्याने ईव्हीएमच मुद्दा पुढे करुन आंदोलन करीत आहे.याच मुद्दावर सर्व विरोधकांनी २१ मार्चला महामोर्चाचे आयोजन केले आहे. पण या मोर्चानंतरही विरोधकांचा पराभवच होईल. विरोधकांनी ईव्हीएम खापर फोडण्याऐवजी जनतेने आम्हाला नाकारले याचे आत्मचितंन करावे.राज्यातील जनतेने पुन्हा एकदा आमच्या सरकारला जनादेश देण्याचा संकल्प केला आहे.हे जनादेश यात्रेदरम्यान जनतेचा मिळत असलेल्या प्रचंड प्रतिसादावरुन दिसून आले. राज्य सरकारने मागील पाच वर्षांत सर्वच क्षेत्रातील अनुशेष दूर केला आहे.गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प मार्गी लावण्यासाठी भरपूर निधी उपलब्ध करुन दिला.गोसेखुर्द प्रकल्पाचे काम जवळपास पूर्ण झाले असून १ लाख हेक्टर शेतीला सिंचनाची सोय झाली आहे. दुग्ध उत्पादन वाढविण्यासाठी एनडीडीबीच्या माध्यमातून ३ हजार गावांमध्ये विशेष प्रकल्प राबविण्यात येत आहे. बऱ्याच वर्षांपासून रखडलेला शेतकऱ्यांच्या जमिनीचा भोगवटदार वर्ग २ मधून वर्ग मध्ये १ रुपातंर करण्याचा प्रश्न मार्गी लावून जमिनीचा मालकी हक्क प्राप्त करुन दिला. रस्ते, सिंचन आणि पायाभूत सुविधांचा विकास केल्याचे सांगितले.पक्ष हाऊसफुल्ल, मात्र जनाधार असलेल्यांचा विचारइतर पक्षांमधून भाजप येणाऱ्या नेत्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.त्यामुळे आता पक्षाने हाऊसफुल्लचा बोर्ड लावला आहे.मात्र जनाधार आणि चांगली प्रतिमा असलेल्या इतर पक्षातील भाजपमध्ये येण्याची ईच्छा असलेल्या नेत्यांचा विचार केला जाईल असे सांगितले. त्यामुळे जिल्ह्यातील एका नेत्याच्या भाजप प्रवेशाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अप्रत्यक्षपणे दुजोरा दिला.वैद्यकीय महाविद्यालयातील त्रृटी दूर करूगोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. तर रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहे.मात्र यानंतरही काही त्रृटी असतील तर त्या निश्चितपणे लवकरच दूर करु असे सांगितले.