शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा कारागृहाचा मुद्दा सभागृहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 22:40 IST

भंडारा-गोंदिया जिल्ह्याचे विभाजन होऊन १९ वर्षांचा कालावधी लोटला. मात्र अद्यापही जिल्हा कारगृहासाठी निधी मंजूर करण्यात आला नाही. ८० कोटी रुपयांची मागणी असताना शासनाने केवळ १ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला.

ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल यांनी वेधले लक्ष : शहरात सीसीटिव्ही केव्हा ?

आॅनलाईन लोकमतगोंदिया : भंडारा-गोंदिया जिल्ह्याचे विभाजन होऊन १९ वर्षांचा कालावधी लोटला. मात्र अद्यापही जिल्हा कारगृहासाठी निधी मंजूर करण्यात आला नाही. ८० कोटी रुपयांची मागणी असताना शासनाने केवळ १ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. त्यामुळे जिल्हा कारगृहाचे काम केव्हा सुरु होणार, निधी केव्हा मिळणार असा मुद्दा विधी मंडळाच्या अधिवेशनात आ.गोपालदास अग्रवाल यांनी सोमवारी (दि.२६) सभागृहात लावून धरला. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यावर उत्तर देणे भाग पडले.गोंदियाला जिल्ह्याचा दर्जा मिळून १९ वर्षांच्या कालावधी पूर्ण होत आहे. मात्र अद्यापही जिल्हा कारागृहाचा प्रश्न मार्गी लागला नाही. जिल्हा कारगृहासाठी गोंदिया येथील कारंजा मुख्यालयामागे जागा मंजूर करण्यात आली. कारागृह बांधकामासाठी ८० कोटी रुपयांचा निधीचा आराखडा तयार करुन गृह विभागाकडे पाठविण्यात आला. आ. अग्रवाल यांनी मागील चार पाच वर्षांपासून हा मुद्दा सातत्याने लावून धरला. गृह विभागाने कारागृहासाठी केवळ १ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. त्यामुळे जिल्हा कारागृहाचे बांधकाम कसे सुरू करणार असा मुद्या आ. अग्रवाल यांनी सभागृहात प्रभावीपणे उपस्थित केला. तसेच यावर उत्तर देण्याची मागणी केली. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा कारागृहासाठी आवश्यक निधी मंजूर करुन हा मुद्या मार्गी लावू असे सांगितले. गोंदिया शहर हे बाजारपेठेसाठी प्रसिद्ध आहे. शहराच्या लोकसंख्येत वाढ झाली असून गुन्हेगारी घटनांमध्ये सुध्दा वाढ झाली आहे. अशा घटनांवर वेळीच आळा घालण्यासाठी सीसीटीव्ही लावण्याची मागणी मागील अनेक दिवसांपासून आहे. हा मुद्दा अधिवेशनात सुध्दा उपस्थित करण्यात आला. मात्र सरकारने यासाठी अद्यापही निधी मंजूर केला नाही. सीसीटीव्ही लावण्याचे निर्देश सुध्दा दिले नसल्याची बाब आ. अग्रवाल यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. मुख्यमंत्र्यांनी यासाठी लवकरच निधी उपलब्ध करुन देवू असे सांगितले.या वेळी आ. अग्रवाल यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यासाठी हुतात्मा झालेल्यांच्या कुटुंबीयांना शासनाने मानधन व इतर सोयी सुविधा लागू करण्याची मागणी केली. यावर मुख्यमंत्र्यांनी निश्चित त्यांना सुध्दा मानधन व इतर सोयी सुविधा देण्यात येतील असे सभागृहाला सांगितले.