शहरं
Join us  
Trending Stories
1
७/११तील सर्व दोषी निर्दोष; असदुद्दीन ओवेसी म्हणतात, “गेली १७ वर्षे निष्पाप लोक जेलमध्ये...”
2
महाराष्ट्रानंतर आता बंगालमध्ये 'भाषा' पॉलिटिक्स? ममता बॅनर्जी यांनी उघड-उघड खेळलं 'बांगला कार्ड'!
3
“कृषीमंत्री रमीत रमतो, हनीट्रॅपचा फास सत्ताधाऱ्यांच्या गळ्यात, उच्चस्तरीय चौकशी करा”: सपकाळ
4
तुमच्या नावे कोणी बनावट लोन तर घेतलं नाहीये ना? घरबसल्या पॅन कार्डावरुन कसं तपासाल, दिसलं तर काय कराल?
5
२३ विद्यार्थिनी-विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार, व्हिडीओही बनवले; वासनांध शिक्षकाचे हादरवून टाकणारे कृत्य
6
'चायनीज' माल निघाला दगाबाज! बांगलादेशात कॉलेजवर कोसळलेले 'ते' लढाऊ विमान चिनी बनावटीचे
7
सचिन पिळगावकरांनी घेतलेली मधुबालाची भेट, म्हणाले, "ती बाई जितकी सुंदर होती त्यापेक्षा १० पटीने..."
8
वेळीच व्हा सावध! सोमवारीच का असतो हार्ट अटॅकचा सर्वाधिक धोका? 'या' गोष्टी कारणीभूत
9
"आम्हाला तोंड उघडायला लावू नका..."; सुप्रीम कोर्ट ईडीवर संतापले; काय आहे प्रकरण?
10
MBA ग्रॅज्युएट चोर; २० वर्षांत चोरल्या १०० हून अधिक आलिशान गाड्या, असा लागला पोलिसांच्या हाती
11
भारत-पाक मॅच रद्द; आफ्रिदीसोबत गप्पा मारताना दिसल्यामुळे अजय देवगण ट्रोल, जाणून घ्या त्यामागचं सत्य
12
अंबानींच्या आवडत्या कंपनीचा शेअर आपटला; पण, 'या' स्टॉक्समुळे सेन्सेक्स-निफ्टीची दमदार वाढ
13
उल्हासनगर: आधी विनयभंग, तुरुंगातून बाहेर येताच पीडित मुलीच्या घरासमोर बँडबाजा व फटाक्याची आतिषबाजी
14
शेअर असावा तर असा! सलग २४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट; किंमत ₹५० पेक्षा कमी, गुंतवणूकदार मालामाल
15
झोपेत असताना तो तिच्यावर लैंगिक अत्याचार करायचा, नंतर लाथा मारायचा; माजी महिला खासदाराने केले गंभीर आरोप
16
Kamika Ekadashi 2025:आपण जन्म मरणाच्या फेऱ्यात का अडकतो? 'हे' सांगणारे चित्र!
17
हवाई दलाचे विमान महाविद्यालयावर कोसळले; अनेकांच्या मृत्यूचा संशय, बांग्लादेशातील घटना
18
Solapur Crime: घरकुलाचा वाद आणि १० वर्षाच्या कार्तिकची हत्या; आरोपी निघाला जवळचा नातेवाईक, सीसीटीव्हीमुळे गूढ उलगडले
19
"विश्वासघात वेदनादायक होता पण..." नवऱ्याच्या व्हायरल व्हिडीओवर अँडी बायरनच्या पत्नीची पहिली प्रतिक्रिया?
20
७ कोटी मुलांसाठी गुड न्यूज; आता शाळेतच होणार आधारशी निगडीत 'हे' काम, UIDAI ची विशेष सुविधा

डोक्यात फरशी घालून इसमाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 06:00 IST

मद्यप्राशन करतांना ग्यानिरामने आपली बॅग चोरीला गेली ती शोधू असे जलीलला सांगितले. परंतु त्यांची बॅग चोरी झाली तेव्हा जलील त्याच ठिकाणी उपस्थित होता. म्हणून त्याची बॅग कुणी चोरून नेली याची माहिती त्याला होती. तरी बॅग शोधण्याचा ढोंग जलील करू लागला. बॅग शोधण्यासाठी दोघेही जयस्तंभ चौकात गेले.

ठळक मुद्देसीसीटीव्हीतून प्रकरणाचा उलगडा : शहर पोलिसांनी केली दोघांना अटक

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मध्यप्रदेशच्या बालाघाट जिल्ह्यातील किरणापूर येथील ग्यानिराम गोपीचंद कुथे (४२) हे कामासाठी गोंदियात आले होते. त्यांची बॅग आरोपीने चोरली. यात त्यांच्याशी वाद झाल्याने त्याच्या डोक्यात फरशीने तीनवेळा घाव घालून गंभीर जखमी केले. त्या इसमाचा उपचार घेतांना गोंदियाच्या वैद्यकीय महाविद्यालयात बुधवारी पहाटे ३.३० वाजता मृत्यू झाला.बालाघाटच्या किरणापूरवरून मृतक ग्यानिराम गोपीचंद कुथे हे २३ सप्टेंबर रोजी सायंकाळी कामानिमीत्त गोंदियाला बॅग घेऊन आले होते. जयस्तंभ चौकातून त्याच दिवशी रात्रीला ग्यानिरामची बॅग त्याच्याजवळून हिसकावून नेली. चोरट्याने त्याच्या हातातून बॅग हिसकावून नेल्यानंतर त्याने आपली बॅग शोधली. परंतु तो बॅग घेऊन जाणारा दिसला नाही. परिणामी रात्र झाल्याने ग्यानिरामने गोंदियातच रात्र काढली. \२४ सप्टेंबरला सकाळ होताच ग्यानिराम गावाला जाण्यासाठी जयस्तंभ चौकातील रिक्षा स्टँडवर आला. तेथे आरोपी जलील शेख इस्राईल शेख उर्फ मालाधरी (४८) रा.शास्त्रीवॉर्ड गोंदिया हा भेटला. त्याला रेल्वे स्टेशनवर सोडून दे असे ग्यानिराम ने म्हटले. त्याला रेल्वे स्टेशनवर सोडून देण्यासाठी रिक्षा घेऊन तो निघाला.रस्त्यात ग्यानिराम व जलील यांच्यात संवाद होऊ लागला आणि त्या दोघांनी दारू पिण्याची योजना आखली. त्यानंतर त्यांनी मद्यप्राशन केले. मद्यप्राशन करतांना ग्यानिरामने आपली बॅग चोरीला गेली ती शोधू असे जलीलला सांगितले. परंतु त्यांची बॅग चोरी झाली तेव्हा जलील त्याच ठिकाणी उपस्थित होता. म्हणून त्याची बॅग कुणी चोरून नेली याची माहिती त्याला होती. तरी बॅग शोधण्याचा ढोंग जलील करू लागला. बॅग शोधण्यासाठी दोघेही जयस्तंभ चौकात गेले. त्यावेळी ग्यानिरामच्या हातातून बॅग हिसकावणारा आरोपी राकेश चैतराम ठाकरे (३५) रा.गौशाला वॉर्ड गोंदिया हा तिथे दिसला.ग्यानिरामने त्याला पकडून माझी बॅग कुठे ठेवली असे बोलून धक्काबुक्की करून लागला. त्यावर राकेशने ती बॅग विवेक मंदिर शाळेच्या मागील भागात असल्याचे सांगितले. ती बॅग देतो चल म्हणून ग्यानिरामला जलीलच्या सायकल रिक्षात बसवून दोघांनी नेले. त्यावेळी त्या भागात कुणीच नसतांना फरशीने त्याच्या डोक्यात घाव घालून रक्तबंबाळ करून निघून गेले. ग्यानिराम रक्ताच्या थारोळ्यात पडला असताना गोंदियाच्या जोगलेकर वॉर्डातील मुजीब हबीब बेग (३९) यांना तो बेशुध्द अवस्थेत पडलेला दिसला.मुजीब यांनी अमित पटेल यांना फोन करुन त्यांना तो रक्ताच्या थारोळ्यात पडल्याची माहिती दिली. अमित पटेल यांनी घटनास्थळ गाठून ग्यानिरामला गोंदियाच्या वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. या घटनेसंदर्भात सुरूवातीला गोंदिया शहर पोलिसांनी अज्ञात आरोपींविरूध्द भादंविच्या कलम ३०७, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. परंतु उपचार घेतांना ग्यानिरामचा २५ सप्टेंबरच्या पहाटे ३.३० वाजता मृत्यू झाला. यासंदर्भात ३०२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.आरोपीपर्यंत पोहचले पोलीसमृतक ग्यानिरामला बॅग देतो म्हणून आरोपी राकेश ठाकरे व जलील शेख या दोघांनी विवेक मंदिर परिसरात घेऊन गेले. त्याच्या डोक्यावर फरशीने तीन वेळा डोक्यात घाव घालण्यात आले. ही सर्व घटना विवेक मंदिर शाळेच्या सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यात कैद झाली. परिणामी आरोपीपर्यंत पोहचण्यात पोलिसांना या कॅमेऱ्याची मदत झाली.१२ तासात आरोपीला अटकया घटनेची साक्ष सीसीटीव्ही कॅमेरा देत असल्याने त्या दोघांना अटक करण्यात आली आहे. २४ सप्टेंबरच्या रात्री ११ वाजताच्या सुमारास त्या दोघांना अटक करण्यात आली. पोलीस कोठडी मिळविण्यासाठी न्यायालयात हजर करण्यात आले. सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश पांडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक बबनराव आव्हाड,सहाय्यक पोलीस निरीक्षक विवेक नार्वेकर, नितीन सावंत, कैलाश गवते, राजू मिश्रा, रॉबीन साठे, विकास बेदक यांनी केली.

टॅग्स :Murderखून