शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

‘आऊटलेट’द्वारे होणार सिंचन

By admin | Updated: May 6, 2017 00:51 IST

भूसंपादनाच्या अडथळ्यात मागील दोन वर्षांपासून रखडलेल्या रजेगाव-काटी मध्यम प्रकल्पास मुख्यमंत्र्यांनी प्रथम प्राधान्य दिल्याने

देवानंद शहारे । लोकमत न्यूज नेटवर्क भूसंपादनाच्या अडथळ्यात मागील दोन वर्षांपासून रखडलेल्या रजेगाव-काटी मध्यम प्रकल्पास मुख्यमंत्र्यांनी प्रथम प्राधान्य दिल्याने त्याचे काम ३० जूनपर्यंत पूर्णत्वास जाण्याच्या मार्गावर आहे. त्यातच आता आऊटलेटद्वारे (विमोचक)सिंचन करण्याचे नवीन प्रस्ताव शासन दरबारी पाठविण्यात आले असून त्याला लवकरच मान्यता मिळण्याची शक्यता आहे. मान्यता मिळून काम पूर्ण झाले तर एका आऊटलेटद्वारे जवळपास पाच ते सहा हेक्टर जमिनीचे सिंचन होणार आहे. जिल्ह्यात सर्वाधिक प्रमाणात धानपीक घेतले जाते. मात्र पर्याप्त प्रमाणात सिंचनाच्या सोयी नसल्यामुळे येथील शेतकरी नेहमी आर्थिक अडचणीत सापडतो. मात्र आता शासनाने सिंचनाच्या सोयी वाढविण्याकडे लक्ष दिल्याचे समजते. सुरूवातीला सन १९९६-९७ मध्ये रजेगाव-काटी मध्यम प्रकल्पाची प्रशासकीय मान्यता २३.३८ कोटींची होती. तर सन २०११-१२ मध्ये ही प्रशासकीय मान्यता ८७.४३ कोटींवर पोहोचली. या प्रकल्पाचे काम पूर्ण झाले तर ४,५६० हेक्टर जमिनीला त्याद्वारे सिंचन होवू शकेल. सद्या वाघ नदीवर पंप हाऊसचे काम पूर्ण झाले आहे. तेथून पाण्याचा उपसा करून वितरण कुंडात घातले जाते. हे पंप हाऊस ते वितरण कुंडाच्या नलिकेची लांबी ७.६ किमी आहे. तिचा डायमीटर १.२ मीटर एवढा आहे. रजेगाव-काटी मध्यम प्रकल्पाच्या सिरपूर, बघोली, सावरी व अर्जुनी या चार प्रमुख वितरिका आहे. त्यांचे काम सुरूच आहे. यात बघोेली व सावरी वितरिकांसाठी भूसंपादन करण्यात आले. मात्र सन २०१३ मध्ये नवीन भू संपादन कायदा आला. यात नवीन भू संपादन कायद्यानुसार जमिनीचे दर देण्यात यावे अन्यथा ताबा देणार नाही, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली होती. तर अर्जुनी वितरिकेसाठी जमिनीच्या रजिस्ट्रीची प्रक्रिया सुरूच आहे. नवीन दर हवे असल्याने शेतकरी ताबा देत नव्हते. त्यांना वाढीव दर हवे होते. जुन्या दराप्रति असंतोष असल्याने मागील दोन वर्षांपासून ही प्रक्रिया रेंगाळत चालली होती. मात्र आता जिल्हाधिकाऱ्यांच्या मध्यस्तीने काही शेतकऱ्यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे. सध्या मूरपार व सिरपूर वितरिकांचे ७० ते ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. अर्जुनी व सावरी वितरिकांवर मातीकाम सुरू असून ३० जूनपर्यंत काम पूर्णत्वास जाण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे. रजेगाव काटी मध्यम प्रकल्प मुख्यमंत्र्यांनी वॉररूममध्ये घालून जून २०१७ पर्यंत सदर प्रकल्प पूर्ण करण्याचे आदेश दिले असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच दोन वर्षांपासून जमिनी देण्यास शेतकऱ्यांनी नकार दिल्याने यावर्षी प्रकल्प पूर्णत्वास नेण्यास जास्त मेहनत घ्यावी लागणार आहे. रजेगाव-काटी प्रकल्प जून २०१७ मध्ये पूर्ण करायचा आहे. काही शेतकऱ्यांना भू संपादनाची भरपाई मिळाली नाही, त्यामुळे त्यांच्यात असंतोष होता. मात्र आता जिल्हाधिकाऱ्यांच्या मध्यस्तीने शेतकऱ्यांकडून ताबा मिळाला आहे. अद्याप काही शेतकऱ्यांनी पैशाची उचल केली नाही तर काहींना भरपाई मिळाली नाही. ही भरपाई शेतकऱ्यांना मिळाली तर ते समाधानी होतील व प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी सहकार्य मिळेल. पी.डी. बडवाईक, कार्यकारी अभियंता, मध्यम प्रकल्प विभाग, गोंदिया १८ गावांना होणार ओलिताची सोय वाघ प्रकल्पाचा खालचा भाग सोडला तर वरील भागातील १८ गावांना रजेगाव-काटी मध्यम प्रकल्पाद्वारे सिंचनाची सोय उपलब्ध होणार आहे. यात अर्जुनी, बघोली, भदूटोला, चारगाव, गर्रा, गर्रा खुर्द, कन्हारटोला, लोधीटोला, मोगर्रा, मरारटोला, मुंडीपार, रजेगाव, सावरी, खातिया, सिरपूर, रावणवाडी, कोचेवाही व गोंदीटोला या १८ गावांचा समावेश आहे. प्रकल्प पूर्ण होताच सदर गावे ओलिताखाली येणार आहेत. आऊटलेटसाठी हेक्टरी लाखाचा खर्च रजेगाव-काटी मध्यम प्रकल्पाचा मुख्य कालवा खुला (ओपन) राहणार आहेत. मात्र या कालव्यातून निघणाऱ्या शाखा बंद नलिका असणार आहेत. त्या शेताखालून जाणार असून शेतजमिनीच्या पृष्ठभागापासून १.५ मीटर आत राहतील. त्यामुळे शेतकऱ्यांना पीक घेण्यास कसलीही अडचण होणार नाही. या बंद नलिकेतून नियोजनानुसार आऊटलेट (विमोचक) किंवा फव्वारा लावण्यात येणार आहे. आऊटलेटसाठी जवळपास ९० हजार ते एक लाख रूपयांचा खर्च प्रति हेक्टर येणार आहे. तसेच एका आऊटलेटद्वारे तब्बल पाच ते सहा हेक्टर जमिनीचे सिंचन होणार आहे. याचा प्रस्ताव शासनास पाठविण्यात आला असून यावर्षी किंवा पुढील वर्षापर्यंत सदर प्रस्तावास मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.