शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय धान खरेदी केंद्रावरील आवक घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 00:43 IST

शेतमालाला हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये, यासाठी जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळ यांच्यातर्फे जिल्ह्यात नुकतेच ८० शासकीय धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले.

ठळक मुद्देकमी उत्पादनाचा फटका : गुणवत्तेवर देखील परिणामी

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शेतमालाला हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये, यासाठी जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळ यांच्यातर्फे जिल्ह्यात नुकतेच ८० शासकीय धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. मात्र कमी पावसामुळे हलक्या धानाला जोरदार फटका बसला आहे. परिणामी धान खरेदी केंद्रावरील आवक घटल्याचे चित्र आहे.जिल्ह्यात धानाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. दरवर्षी दिवाळी दरम्यान हलके धान विकून शेतकरी दिवाळीचा सण साजरा करतात. मात्र यंदा जिल्ह्यात कमी पाऊस झाला. शिवाय हलक्या धानाला वादळी पावसाचा तडाखा बसला. त्यामुळे धानाचे उत्पादन आणि दर्जावर देखील परिणाम झाला आहे.दरवर्षी दिवाळीच्या सुरुवातीपासून धान खरेदी केंद्र आणि खासगी व्यापाºयांकडे धान विकण्यासाठी शेतकºयांची गर्दी दिसत होती. मात्र यंदा दिवाळी संपून आठ ते दिवसांचा कालावधी लोटला. यानंतरही शासकीय धान खरेदी केंद्रावरील आवक वाढलेली नाही. त्यामुळे जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाच्या धान खरेदी केंद्रावर शुकशुकाट असल्याचे चित्र आहे.यावर्षी शासनाने अ ग्रेड धानाला १५९० व सी ग्रेड धानाला १५५० हमीभाव जाहीर केला आहे. वाढत्या उत्पादन खर्चाच्या तुलनेत हे दर जरी कमी असले तरी यापेक्षा कमी दराने शेतकºयांना धान विकण्याची वेळ येऊ नये, यासाठी शासनाने गोंदिया जिल्ह्यात जिल्हा मार्केटिंग फेडरेशतर्फे ५८ आणि आदिवासी विकास महामंडळा अंतर्गत २८ धान खरेदी केंद्र सुरू केले आहेत.मात्र यासर्वच केंद्रावर आवक वाढली नसल्याचे चित्र आहे. देवरी आदिवासी विकास महामंडळातंर्गत दरवर्षी खरीपात ३ लाख क्विंटल धानाची खरेदी केली जाते. मात्र यंदा कमी पाऊस आणि कीडरोगांमुळे धानाच्या उत्पादनात घट होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे धान खरेदी अर्ध्यावर येण्याची शक्यता या विभागाच्या अधिकाºयांनी वर्तविली आहे.तर हीच स्थिती जिल्हा मार्केटिंग फेडरेशनची आहे.