शहरं
Join us  
Trending Stories
1
"अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
3
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
4
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
5
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
6
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
7
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
8
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
9
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
10
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
11
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
12
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
13
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
14
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
15
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
16
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
17
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
18
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
19
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
20
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय

टॉवर्स देताहेत आजाराला आमंत्रण

By admin | Updated: June 14, 2014 23:42 IST

गेल्या आठ-दहा वर्षात मोबाईल टॉवर्सने शहराला विळखा घातला आहे. मोबाईल फोनची सेवा देण्यासाठी हे टॉवर उभारण्यात आले आहेत. हे टॉवर उभारण्यासाठी शासकीय धोरणानुसार नगर पालिकेची

नियमांना बगल : शहरात आहेत २५ पेक्षा अधिक टॉवरगोंदिया : गेल्या आठ-दहा वर्षात मोबाईल टॉवर्सने शहराला विळखा घातला आहे. मोबाईल फोनची सेवा देण्यासाठी हे टॉवर उभारण्यात आले आहेत. हे टॉवर उभारण्यासाठी शासकीय धोरणानुसार नगर पालिकेची परवानगी आवश्यक असते. परंतु शहरातील बहुतांश टॉवर बेकायदेशीररित्या उभे आहेत. ज्या ठिकाणी हे टॉवर उभारले गेले आहेत. त्या परिसरात कर्करोग, स्मृतिभ्रंश होणे, सततची डोकेदुखी, अशक्तपणा, दृष्टी कमी होणे, रोगप्रतिबंधक शक्ती कमी होणे आदी आजार उद्भवत आहेत. जेवढे अधिक टॉवर तेवढे चांगले नेटवर्क असे समीकरण असते. ग्राहकांना उत्तम सेवा देण्यासाठी मोबाईल कंपन्या मोक्याच्या जागा शोधून हे टॉवर उभारतात. एकेकाळी शहराच्या बाहेर असणारे हे टॉवर आता भरवस्तीतही उभारले गेले आहे.प्रत्येकाच्या हातात मोबाईल आला आहे. ग्राहकांची संख्या वाढल्याने त्यांना चांगली सेवा मिळावी या हेतूने अनेक कंपन्या स्पर्धेत उतरल्या. या सोबतच शहरात टॉवरची संख्याही वाढली. इमारतीवर टॉवर उभारण्यासाठी इमारतीच्या मालकाला दरमहा १० ते १५ हजार रुपयांपर्यत भाडे मिळते. या रकमेसाठी कोणत्याही स्वरूपाच्या दुष्परिणामांची पर्वा न करता टॉवरसाठी अनुमती दिली जाते. शहरातील मोबाईल टॉवर हे नगरपालिकेतील काही लोकांच्या कमाईचेसुध्दा साधन बनले आहे. पुसद शहरात किती टॉवर्स आहे. त्यांनी परवानगी घेतली किंवा नाही, किती अधिकृत, किती अनधिकृत याचे रेकॉर्डसुध्दा नगर परिषदेकडे नाही. प्राप्त माहितीनुसार, अनधिकृत टॉवरचीच संख्या जास्त असल्याचे निदर्शनास येत आहे. रहिवाशी भागात झपाट्याने वाढणाऱ्या मोबाईल टॉवरच्या जाळ्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. टॉवरमधून निघणाऱ्या रेडिओ लहरींमुळे शहरवासीयांना विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. टॉवर उभारण्यासाठी राज्य सरकारने काही नियम घालून दिले आहेत. परंतु याही नियमांचे सर्रास उल्लंघन होत आहे. शहरातील अनेक टॉवर नियमबाह्य असल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. मोबाईल टॉवरमधून निघणाऱ्या रेडिओ लहरीपणामुळे आजार उद्भवत असल्याचे अनेक शहरांमध्ये उघडकीस आला आहे. मुंबई ईस्टमध्ये ९१ मिटर परिसरात राहणाऱ्या रहिवाशांना विविध प्रकारचे कर्करोग झाल्याचे निदान झाले आहे. पक्षी टॉवरच्या परिसरात क्वचित दिसतात. कारण अती दाबांच्या लहरीमध्ये कमी वजनाच्या पक्ष्यांच्या शरीरातील तापमानवाढ होत असल्याचेही उघड झाले आहे. त्यामुळे चिमण्यांचे अस्तित्व शहरी भागांमधून नष्ट झाले आहे. गुरगाव दिल्लीमध्ये तर चार टॉवर असललेल्या परिसरामधील फळझाडांना येणाऱ्या फळांचे उत्पादन ९५ टक्यांंने कमी झाले आहे. हे सर्व प्रकार पुढे यत असले तरी भारतीय शास्त्रज्ञांकडून मोबाईल लहरींवर अद्याप एकमत नाही. एम.टेक., बी.टेक. ला असलेले विद्यार्थी या मोबाईल टॉवर्समधून निघणाऱ्या लहरींमुळे होणाऱ्या दुष्परिणामांचा अभ्यास करीत आहेत. गोंदिया शहरात २५ पेक्षा जास्त टॉवरची संख्या आहे. यामध्ये बीएसएनएल, आयडिया, ओडाफोन, एअरटेल, रिलायन्स, युनियॉर, टाटा आदी कंपन्याच्या टॉवरचा समावेश आहे. अनेकांनी नगर पालिकेची परवानगी न घेताच टॉवर उभारलेले असले तरी निकष डावलून टॉवर उभारणाऱ्यांची संख्या जास्त आहे. २०० फूट उंचीच्या मोबाईल टॉवरमधून निघणाऱ्या रेडिओ लहरी जमिनीत समांतर जात असल्यातरी त्या सिमेंट कॉक्रिटच्या भिंतींही भेदून आरपार जातात. तसेच त्या मानवी शरीरालाही भेदून जात असल्याने आजार होण्याची शक्यता असते. सोबतच मोबाईल टॉवर वातानुकूलित ठेवण्यासाठी लावण्यात आलेल्या जनरेटरमुळे परिसरामध्ये प्रदूषणात वाढ होते.या प्रकाराकडे नगरपरिषदेने लक्ष देण्यची मागणी आहे. (तालुका प्रतिनिधी)