शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

शेंडा ते पुतळी मार्ग मृत्यूला आमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 22:12 IST

सडक-अर्जुनी तालुक्यातील शेडा ते पुतळी मार्गावर प्रधानटोला फाट्याजवळ डांबरीकरण मार्गावर पाच फूट खोल खड्डा पडला आहे. तो भूस्खलनाचा प्रकार असावा, असे गावकऱ्यांचे मत आहे. डांबरीकरण मार्गाचा अर्धा भाग खचून खड्ड्यात विलीन झाला आहे.

ठळक मुद्देभूस्खलनाचा प्रकार : सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष, दुरुस्तीची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कशेंडा-कोयलारी : सडक-अर्जुनी तालुक्यातील शेडा ते पुतळी मार्गावर प्रधानटोला फाट्याजवळ डांबरीकरण मार्गावर पाच फूट खोल खड्डा पडला आहे. तो भूस्खलनाचा प्रकार असावा, असे गावकऱ्यांचे मत आहे. डांबरीकरण मार्गाचा अर्धा भाग खचून खड्ड्यात विलीन झाला आहे. याच मार्गावरुन रात्रंदिवस दुचाकी, चारचाकी आणि जड वाहनांची वर्दळ असते. याच मार्गावरच खड्डा पडल्याने कोणत्याही क्षणी अपघात घडून जीवीतहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाने अद्यापही हा रस्ता दुरूस्ती न केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.शेंडा येथून ४ किमी व राष्ट्रीय महामार्ग-६ वरून तीन किमी अंतरावर असलेल्या प्रधानटोला फाट्याजवळ डांबरीकरण मार्गावर भूस्खलन होवून अंदाजे पाच फूट खोल खड्डा पडला आहे.यामध्ये डांबरीकरणाचा अर्धा भाग खचून खड्यात समाविष्ट झाला आहे. या मार्गावरुन वाहनांची वाहतूक सुरू असल्याने कोणत्याही क्षणी वाहत खड्ड्यात पडून जीवित हानी होवू शकते. तरीही या प्रकारामुळे सा.बां. विभागाने दुर्लक्ष केल्याचे दिसून येते.या खड्ड्यात कोणीही पडू नये यासाठी पादचाºयांनी झाडाच्या फांद्या टाकून वाहन चालकांना अलर्ट केले आहे. मात्र एवढ्यावरच अपघात टाळता येत नाही. रात्रीच्या वेळी सुध्दा वाहने ये-जा करतात.अशावेळी वाहन चालकांना कमालीचा त्रास सहन करावा लागतो. अनवधानाने वाहन सरळ मार्गाने नेण्याचा प्रयत्न केल्यास वाहन खड्ड्यात पडल्याशिवाय राहणार नाही किंवा जीवहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.तीन महिन्यांपूर्वीच या मार्गाचे नव्याने डांबरीकरण करण्यात आले होते. रस्त्याची गुणवत्ता बघण्यासाठी अभियंता याच मार्गाने ये-जा करीत होते. त्यावेळी त्यांना खड्डा दिसला नाही का? किंवा लालसेपोटी कंत्राटदारांशी संगनमत करुन आपसात सोटेलोटे तर केले नसावे, असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीचे काम सा.बां. विभागाचे आहे. अधूनमधून तरी या विभागाचे कर्मचारी, अधिकारी या मार्गाने ये-या करीत असतील. त्यांना या खड्ड्याची माहिती नसावी का? किंवा एखाद्या अपघाताची वाट तर बघत नाही? असे वाहन चालकांकडून बोलले जाते.जनतेचे हित लक्षात घेवून त्वरित या खड्ड्याची दुरूस्ती करुन वाहनचालकांना मार्ग सुकर करुन देण्यात यावा, अशी मागणी वाहन चालकांनी तसेच जनतेने केली आहे.

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभागroad safetyरस्ते सुरक्षा