शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

हल्ल्याचा सर्वत्र निषेध

By admin | Updated: April 10, 2016 01:54 IST

गोंदियाचे आमदार आणि राज्य लोकलेखा समितीचे अध्यक्ष गोपालदास अग्रवाल यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा सर्वच स्तरातून निषेध व्यक्त करण्यात आला.

गोंदिया : गोंदियाचे आमदार आणि राज्य लोकलेखा समितीचे अध्यक्ष गोपालदास अग्रवाल यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा सर्वच स्तरातून निषेध व्यक्त करण्यात आला. एका लोकप्रतिनिधीवर अशा पद्धतीने हल्ले होत असतील तर त्यांनी काम तरी कसे करावे, असा सूर राजकीय क्षेत्रात उमटत आहे. दरम्यान, अशा पद्धतीने एका आमदारावर हल्ला करून त्यांना मारहाण करण्याचा प्रकार पहिल्यांदाच घडल्यामुळे शहरवासीयांसोबत जिल्हाभरात सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे.आमदार गोपालदास अग्रवाल यांची पत्रपरिषद सुरू असताना भाजपचे गोंदिया नगर परिषदेतील स्वीकृत नगरसेवक शिव शर्मा व त्यांच्या एका सहकाऱ्याने तिथे येऊन त्यांना मारहाण केली. यात त्यांच्या नाकाला जबर मार लागला. यातच त्यांचे कपडेही फाटले. त्यांच्या बचावासाठी गेलेले त्यांचे पुत्र विशाल यांचेही कपडे आरोपींनी फाडले. विशेष म्हणजे भर पत्रपरिषदेत हा प्रकार घडल्याने सारेच अवाक झाले.या प्रकाराने तिथे उपस्थित जि.प. अध्यक्ष उषाताई मेंढे यासुद्धा घाबरून गेल्या होत्या. पण त्या परिस्थितीतही त्यांनी आ.अग्रवाल यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. आ.अग्रवाल यांना अ‍ॅम्बुलन्सने केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात नेल्यानंतर तिथे त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्यांना गोंदियाच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेचे वृत्त रात्री ८ वाजेपर्यंत गोंदिया शहरात आणि जिल्ह्यात पसरले. शहरात संतप्त काँग्रेस कार्यकर्त्यांनी बाजारपेठेत फिरून दुकाने बंद केली. यामुळे शहरात रात्री उशिरापर्यंत तणावाची परिस्थिती होती. घटनास्थळावर रात्री उशिरापर्यंत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून सर्वांचे बयाण नोंदवून घटनाक्रमाचे पुरावे गोळा करण्याचे काम सुरू होते. नगरसेवक शिव शर्मा आणि साथीदाराविरूद्ध गुन्हा दाखल केला जाईल असे रामनगर ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (जिल्हा प्रतिनिधी) आज गोंदिया बंदया भ्याड हल्ल्याचा निषेध म्हणून आणि संबंधितांवर कडक कारवाई करावी यासाठी काँग्रेस पक्ष व काँग्रेसच्या सर्व सेलकडून रविवारी गोंदिया शहरात बंद पाळण्याचे आवाहन करण्यात आले. हा बंद शांततेच्या मार्गाने करावा असे आवाहन प्रफुल्ल अग्रवाल यांनी केले.