शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

सोने चोरणारी आंतरराज्यीय टोळी पकडली ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:35 IST

अर्जुनी मोरगाव : देवाची श्रद्धा दाखवून महिला व्यापाऱ्याचे मंगळसूत्र लंपास करणाऱ्या पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. यामागे आंतरराज्यीय ...

अर्जुनी मोरगाव : देवाची श्रद्धा दाखवून महिला व्यापाऱ्याचे मंगळसूत्र लंपास करणाऱ्या पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. यामागे आंतरराज्यीय टोळीचा हात होता. पाचही आरोपींना मध्यप्रदेश राज्यातील पांढुर्णा येथून अटक करण्यात आली. स्थानिक न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली आहे.

स्थानिक ओजस जनरल व मॅचिंग सेंटरमध्ये आरोपींनी ३ सप्टेंबर रोजी हातचलाखी करून महिला व्यापाऱ्याचे मंगळसूत्र लंपास केले होते. अर्जुनी मोरगाव पोलीस चोरट्यांच्या मागावर होते. मंगळसूत्र लंपास होताच पोलिसांनी मार्गावरील सर्व पोलीस ठाण्यांना सूचना दिली होती. पोलीस विभागाच्या समाज माध्यमांवर संदेश देण्यात आले होते. सीसीटीव्ही तपासण्यात आले. याची माहिती पांढुर्णा पोलिसांना मिळाली. त्यांनी पाच आरोपींना अटक केली. यात टोळीप्रमुख वसीम सिराज अब्बास (३७) रा आंबिवली कल्याण ठाणे, माशाअल्ला नव्वर अली (३२) रा. टिटीनगर जि. शहडोल मप्र, मुक्तारअली पिल्लू अली (३८), जितेंद्र गोकुलप्रसाद रॉय (३०),गंगाराम नगराम नरबरेय्या (४५) तिघेही रा भोपाल यांचा समावेश आहे. यांना मंगळवारी अर्जुनी मोरगाव येथे आणण्यात आले.

...............

विविध ठिकाणी केल्या चोऱ्या

३ सप्टेंबरला सकाळी बालाघाट येथून चार तोळे सोने चोरी करून आले. दुपारी अर्जुनी मोरगाव येथे महिलेचे १२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र चोरले. ४ सप्टेंबर रोजी चंद्रपूर येथे सव्वा लाखांवर डल्ला मारला. त्याच रात्री वणी यवतमाळ येथे सव्वा लाखांची चोरी केली. वणीमार्गे नागपूर व त्यांनतर पांढुर्णाकडे पलायन केले. ही कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात सहा पोलीस निरीक्षक सोमनाथ कदम, हवालदार आनंदराव इस्कापे, नायक बेहरे, विजय कोटांगले, शिपाई गौरीशंकर कोरे, श्रीकांत मेश्राम, पंकज शिवरकर, कुहीकर, लोकेश कोसरे, प्रशांत बागडे व राहुल चिचमलकर यांनी केली.

.......

अशी होती चोरीची पद्धत

सर्वप्रथम ते रेखी करायचे. त्यांना गाव, शहरांची नावे माहिती नसायचे. मोठे गाव, शहर दिसले की बाजारपेठ गाठायची. चोरीची मोहीम फत्ते होईल असे सुरक्षित स्थळ शोधायचे. सावजाचा शोध घ्यायचा. तिथे टोळीप्रमुख यायचा. आम्हाला दान करायचा शौक आहे असे सांगत पूजाअर्चा ठेवायची व स्वतःकडील एक हजार रुपये काढून पूजेत ठेवायचे व हे पैसे तुम्हालाच होतील अशी बतावणी करायचे. हजार रुपयांच्या लालसेपोटी कुणीही सहज तयार व्हायचे याचा लाभ ते घ्यायचे. पूजेवर सोन्याचे दागिने ठेवायला सांगत असत. हातचलाखी करून सोन्याचे दागिने घेऊन जायचे. जाताना ही पूजा अर्धा तास उचलू नका असे सांगत पलायन करायचे.

......

पोलिसांची दिशाभूल करायचे

चोरी केल्यानंतर दुचाकीने जायचे. ठरलेल्या मार्गावर काही अंतरावर चारचाकी वाहन उभे असायचे. दुचाकीवरून उतरून वाहनात बसायचे. वाहनात कपडे बदलून काही अंतरापर्यंत गेल्यानंतर परत दुचाकीने प्रवास करायचा व वेगवेगळ्या मार्गाने पलायन करायचे. लांब पल्ला गाठल्यावर भ्रमणध्वनीद्वारे एकमेकांशी संपर्क करून एकत्र यायचे. या पद्धतीने पोलिसांची तपासाची दिशा मंदावण्यासाठी शक्कल लढवून दिशाभूल करण्याचा प्रयत्न करायचे.

150921\img-20210914-wa0019.jpg

सोने चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीतील आरोपी