शहरं
Join us  
Trending Stories
1
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
2
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
3
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
4
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
5
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
6
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
7
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
8
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
9
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
10
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
11
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
12
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
13
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
14
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
15
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
16
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
17
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
18
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
19
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
20
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)

वीरांगणा अवंतीबाई लोधी यांच्या बलिदानातून प्रेरणा घ्यावी

By admin | Updated: March 25, 2015 01:16 IST

अमर शहीद वीरांगणा महाराणी अवंतीबाई लोधी स्मारक समिती गोंदियाच्या वतीने विरांगणा अवंतीबाई लोधी यांच्या १५७ व्या बलिदान दिनाचे कार्यक्रम ....

गोंदिया : अमर शहीद वीरांगणा महाराणी अवंतीबाई लोधी स्मारक समिती गोंदियाच्या वतीने विरांगणा अवंतीबाई लोधी यांच्या १५७ व्या बलिदान दिनाचे कार्यक्रम अवंतीबाई लोधी चौक रिंग रोड गोंदिया येथे पार पडले. यात खा. प्रल्हाद पटेल यांनी अवंतीबाईच्या बलिदानातून समाजाने प्रेरणा घ्यावी, असे मत व्यक्त केले.बलिदान दिनाचे औचित्य साधून अभियंता राजीव ठकरेले यांच्या संकल्पनेतून स्वच्छ गोंदिया स्वस्थ समाज कार्यक्रम घेण्यात आले. उद्घाटन नगरसेवक बंटी पंचबुद्धे यांच्या हस्ते नगराध्यक्ष कशिश जायस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. अतिथी म्हणून न.प. सभापती राकेश ठाकूर, नगरसेवक राजकुमार कुथे, अशोक गुप्ता, अनिल पांडे, सरपंच घनश्याम लिल्हारे, अनिल नागपुरे, मनोज नागपुरे होते. याप्रसंगी स्वच्छ गोंदिया स्वच्छ समाज अंतर्गत रॅली काढण्यात आली. त्यानंतर विरांगणा अवंतीबाई लोधी यांच्या मूर्तीचे अनावरण करण्यात आले. अनावरणाच्या अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय मंत्री व खा. प्रल्हादसिंग पटेल होते. उद्घाटन खा. नाना पटोले यांनी केले. अतिथी म्हणून माजी आ. भेरसिंग नागपुरे, आ. गिरवर जंगेल, चित्रपट कलावंत राकेश राजपूत, प्रविण कन्होले, कमलसिंग वर्मा, जि.प. सदस्य रमेश लिल्हारे, कुंदर कटारे, अर्जुन नागपुरे, सभापती यादनलाल बनोठे, अ‍ॅड. येशुलाल उपराडे उपस्थित होते. प्रास्ताविकात समितीचे सचिव राजीव ठकरेले यांनी केले. खा. प्रल्हादसिंग पटेल म्हणाले की, समाजाने धैर्य ठेवून एकजुटीने कार्य करावे. समाजात शिक्षणाचे स्तर उंच उठवावे. त्यामुळे सुशिक्षीत समाज निर्माण होईल. खा. नाना पटोले यांनी लोधी समाजाला केंद्राने ओबीसीच्या सूचित लवकरात लवकर समाविष्ट केले जाणार आहे, असे आश्वासन दिले. तसेच लोधी समाजाला नेहमी मदत करण्याचे आश्वासन दिले. चित्रपट कलावंत राकेश राजपूत यांनी सर्व स्वजातीय लोकांनी आपले नावासमोर लोधी लावून संपूर्ण जगासमोर एक ओळख निर्माण करावी, असे आवाहन केले. या वेळी साहेबलाल सरल, कुर्रा, आनंद अमन आणि काटोलचे खुशबू किरण यांनी काव्य सादर करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. संचालन लिल्हारे, निरज नागपुरे, अरविंद उपवंशी व संदीप नागपुरे यांनी तर आभार सवालाखे व सूर्यकांत नागपुरे यांनीमानले. (प्रतिनिधी)