शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा सीमेवर वाहनचालकांची तपासणी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2020 05:00 IST

जिल्ह्यात भाजीपाला, रेशन, फळ व अन्य जीवनावश्यक वस्तू पर जिल्हे व राज्यांतून वाहनांच्या माध्यमातून येत आहेत. यातील बरेच वाहने उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि विशेषत: कोरोना हॉटस्पॉट असलेल्या नाशिक आणि नागपूर येथून येत आहेत. या वाहनांतील चालक व वाहकांचा येथील लोकांशी थेट संपर्क येत असून हा प्रकार धोकादायक आहे.

ठळक मुद्देअन्य जिल्ह्यातील वाहनांमुळे धोका : कॉँग्रेस पदाधिकाऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मागील काही दिवसांपासून जीवनावश्यक वस्तुंची ने-आण करणाºया वाहनांची वर्दळ वाढली आहे. पर जिल्हे व राज्यातून येणाऱ्या या वाहनांच्या चालक व वाहकांचा जिल्ह्यातील लोकांशी प्रत्यक्ष संपर्क येतो. हा प्रकार धोकादायक असून अन्य जिल्ह्यांतून येणाºया वाहनांच्या चालक व वाहकांची जिल्हा सीमेवर तपासणी करावी अशी मागणी कॉँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केली असून जिल्हाधिकाºयांना या संदर्भात निवेदन दिले.जिल्ह्यात भाजीपाला, रेशन, फळ व अन्य जीवनावश्यक वस्तू पर जिल्हे व राज्यांतून वाहनांच्या माध्यमातून येत आहेत. यातील बरेच वाहने उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि विशेषत: कोरोना हॉटस्पॉट असलेल्या नाशिक आणि नागपूर येथून येत आहेत.या वाहनांतील चालक व वाहकांचा येथील लोकांशी थेट संपर्क येत असून हा प्रकार धोकादायक आहे. जिल्ह्यातील एकमेव रूग्ण आता बरा झाल्याने जिल्हा कोरोनामुक्त झाला आहे. अशात मात्र बाहेरून येणाऱ्या वाहनांच्या चालक व वाहकांमुळे धोका उत्पन्न होण्याची शक्यता टाळता येत नाही. करिता या वाहनांच्या चालक-वाहकांची जिल्हा सीमेवर वैद्यकीय तपासणी करूनच त्यांना प्रवेश देण्यात यावा अशी मागणी कॉँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केली आहे.यासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव अमर वऱ्हाडे, जिल्हा युवा काँग्रेसचे अध्यक्ष आलोक मोहंती, गोंदिया जिल्हा एनएसयुआयचे अध्यक्ष हरिष तुळसकर, अर्पीत बंसोड तसेच पदाधिकारी उपस्थित होते.बाहेर अडकलेल्या व्यक्तींना आणा‘लॉकडाऊन’मुळे मोठ्या प्रमाणात मजूर, विद्यार्थी व काही लोक पर जिल्हे व राज्यांत अडकून पडले आहेत. जिल्हा बाहेर आणि विशेषत: परप्रांतात अडकलेल्या मजुरांकडे सध्या एक नवा पैसाही शिल्लक उरलेला नाही. त्यामुळे त्या लोकांपुढे उपासमारीची वेळ आली असून ते पायीच प्रवास करीत आपल्या गावाकडे निघाले आहेत. परिणामी मोठ्या संख्येत मजुरांचे जत्थे दिसत आहेत. त्यांचीही तपासणी होत नसल्याने तेही धोकादायक ठरत आहेत. जिल्ह्यातील अशा लोकांची यादी बनवून द्यावी. जेणेकरुन महाराष्ट्र शासनाचे आदेश येताच त्यांना परत आणण्याकरीता योग्य पाऊल उचलता येतील. विद्यार्थी व लोकांनाही अशाच प्रकारे आणण्याची व्यवस्था करता येईल असेही कॉँग्रेस पदाधिकाºयांची सूचविले. तसेच इतरत्र असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील तसेच जिल्ह्यामध्ये असणाºया परप्रांतीय विद्यार्थी आणि मजूरांची मोबाईल क्रमांकासहीत यादी सादर केली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या