शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
3
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
4
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
5
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
6
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
7
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
8
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
9
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
10
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
12
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
13
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
14
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
15
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
16
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
17
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
18
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
19
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
20
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द

कीडीमुळे पीक धोक्यात

By admin | Updated: August 26, 2016 01:25 IST

यावर्षीही लहरी पावसाचा फटका जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बसला आहे. दुबार पेरणी करण्याची पाळी ओढवली

खोडकीडा व लष्करी अळी : ५० टक्के अनुदानावर शेतकऱ्यांना देणार कीटकनाशकगोंदिया : यावर्षीही लहरी पावसाचा फटका जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बसला आहे. दुबार पेरणी करण्याची पाळी ओढवली असतानाही शेतकऱ्यांनी पेरणी केली. पावसाच्या अभावाने काही ठिकाणी आवत्याही टाकण्यात आल्या. मात्र आता शेतकऱ्यांच्या संकटात पुन्हा भर पडून सध्या भापपिकांवर खोडकिडा व लष्कळी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे अपेक्षित उत्पन्न मिळणार की नाही, याची चिंता बळीराजाला सतावत आहे.कृषी विभागाच्या माहितीनुसार, जिल्ह्यातील आठ तालुक्यांपैकी गोंदिया व सडक-अर्जुनी या दोन तालुक्यांत भातपिकांवर खोडकिडा (वायएसबी) व लष्करी अळी यांचा प्रादुर्भाव आढळला आहे. मागील आठ दिवसांपूर्वी गोंदिया तालुक्याच्या आसोली व परिसरात खोडकिड्याचा प्रादुर्भाव आढळला होता. मात्र कृषी विभागाच्या सल्ल्याने व औषधाने सध्या ही कीड नियंत्रणात असल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे. सद्यस्थितीत सडक-अर्जुनी तालुक्यातील डुग्गीपार, ब्राह्मणी, रेंगेपार, खोबा व जवळील परिसरात खोडकिडा व लष्कळी अळींनी धानपिकांना ग्रासले आहे. मात्र ते आर्थिक नुकसान पातळीच्या आत असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाचे म्हणणे आहे. तरीही शेतकऱ्यांचे नुकसान होणार, यात शंका नाही.यावर प्रतिबंध घालण्यासाठी कृषी विभागाने ५० टक्के अनुदानावर औषधी उपलब्ध करून दिली आहे. यात सीओसी औषध ३११ किलो व क्लोरोपायरीफास्ट ३०४ लिटर संपूर्ण जिल्ह्याकरिता उपलब्ध करून दिले आहेत. लष्करी अळींच्या प्रतिबंधासाठी चार हजार लिटर डायक्लोरोवास्ट ही औषधी ५० टक्के अनुदानावर शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा कृषी विभागामार्फत विभागीय कृषी सहसंचालकांकडे मागणी करण्यात आली आहे. सध्या शेतीला पावसाची गरज आहे. पाऊस न पडल्यास व योग्य प्रमाणात उन्ह न निघाल्यास रोगांचा प्रादुर्भाव आणखी होण्याची दाट शक्यता आहे. १०४ टक्के लागवडगोंदिया तालुक्यात रोवणी ३६०१३.७ हेक्टरमध्ये, गोरेगाव २०,३७४ हेक्टर, सालेकसा १५,७९२ हेक्टर, तिरोडा २७,९६५ हेक्टर, आमगाव १८,४४० हेक्टर, अर्जुनी-मोरगाव २१,६७२ हेक्टर, सडक-अर्जुनी १८,२८० हेक्टर, तर देवरी तालुक्यात १६,२१४ हेक्टरमध्ये रोवणीचे काम आटोपले आहे. आवत्या गोंदिया तालुक्यात १८७७.६ हेक्टर, गोरेगाव ५०३ हेक्टर, सालेकसा ९२६ हेक्टर, तिरोडा २४४ हेक्टर, आमगाव २८९ हेक्टर, अर्जुनी-मोरगाव ७३५.२ हेक्टर, सडक-अर्जुनी ८०२ हेक्टर व देवरी तालुक्यात ५,१२६ हेक्टरमध्ये घालण्यात आल्या. जिल्ह्यात एक लाख ७४ हजार ७५०.७ हेक्टरमध्ये रोवणी व १० हजार ५०२.८ हेक्टरमध्ये आवत्या टाकण्यात आल्या असून रोवणी व आवत्या मिळून एकूण लागवड १०४ टक्के झालेली आहे.