शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

अपघातात पती ठार, पत्नी गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 21:19 IST

भरधाव टवेरा वाहनाने मोटारसायकलला दिलेल्या धडकेत पती ठार तर पत्नी गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी (दि.३०) सायकांळी ५ वाजताच्या सुमारास कोहमारा-अर्जुनी मोरगाव मार्गावरील येरंडी गावाजवळ घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कबाराभाटी : भरधाव टवेरा वाहनाने मोटारसायकलला दिलेल्या धडकेत पती ठार तर पत्नी गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी (दि.३०) सायकांळी ५ वाजताच्या सुमारास कोहमारा-अर्जुनी मोरगाव मार्गावरील येरंडी गावाजवळ घडली. प्रकाश शिवणकर, रा. पिंपळगाव खांबी असे अपघातात ठार झालेल्या पतीचे नाव आहे तर वनिता शिवणकर असे अपघातात जखमी झालेल्या पत्नीचे नाव आहे.प्राप्त माहितीनुसार शिवणकर दाम्पत्य हे बौध्दनगर (परसोडी) येथून मोटारसायकलने परत येत होते. दरम्यान अर्जुनी-मोरगाव कडून येणाऱ्या टवेरा वाहनाने त्यांच्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली. यात प्रकाश शिवणकर जागीच ठार झाले तर पत्नी वनिता शिवणकर गंभीर जखमी झाली. तिच्या पायाला दुखापत झाली. त्यांना नवेगावबांध येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकाश शिवणकर यांचे नुकतेच लग्न झाले. ते बौध्दनगरवरुन कोहमारा मार्गे सासरवाडीवरुन परत येत होते. दरम्यान या अपघातात शिवणकर यांचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. मोटारसायकलला धडक देणारी टवेरा गाडी कुणाच्या मालकीच्या हे अद्यापही कळू शकले नाही. अपघातानंतर टवेरा गाडीचा वाहनचालक घटना स्थळावरुन पसार झाला. या अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांनी तब्बल दोन तास जमाव करुन मृतकाच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे. याप्रकरणी अर्जुनी मोरगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.