शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

संवाद यात्रेमधून मिळेल शेतकऱ्यांना माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2017 00:37 IST

केंद्र व राज्य शासनाच्या अनेक योजनांची माहिती शेतकऱ्यांना देण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी भारतीय जनता पक्षाकडून

राजकुमार बडोले : भाजपाची शिवार संवाद यात्रा सुरूलोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : केंद्र व राज्य शासनाच्या अनेक योजनांची माहिती शेतकऱ्यांना देण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी भारतीय जनता पक्षाकडून गुरूवार २५ मेपासून संपूर्ण राज्यात शिवार संवाद यात्रा सुरू होत आहे. या अंतर्गत २५ ते २८ मे दरम्यान जिल्ह्यातील सर्व आमदार, खासदार, जि.प. सदस्य, पं.स. सदस्य व लोकप्रतिनीधी या यात्रेत सहभागी होऊन शेतातील बांद्यांवर जावून शेतकरी व शेतमजुरांशी संवाद साधणार आहेत. त्यांना सरकारने केलेल्या कामांची व योजनांची माहिती देवून त्यांच्या समस्या जाणून घेण्याची ही यात्रा असून सर्व पदाधिकारी व कार्यकत्र्यांनी नियोजनानुसार कार्य करण्याचे आवाहन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले आहे. मंगळवारी २३ मे रोजी शासकीय विश्रामगृहात भाजपाच्या प्रमुख पदाधिकाधिऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष हेमंत पटले होते. बैठकीत प्रामुख्याने आ. विजय रहांगडाले, आ. संजय पुराम, माजी आ. केशवराव मानकर, माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल, जिल्हा परिषद उपाध्यक्ष रचना गहाणे, जिल्हा संघटन महामंत्री विरेंद्र अंजनकर, जिल्हा महामंत्री भाऊराव उके, रविकांत बोपचे, नगरसेवक भरत क्षित्रय, दिनेश दादरीवाल, संजय कुलकर्णी, जयंत शुक्ला आदी उपस्थित होते. पालकमंत्री बडोले पुढे म्हणाले, २५ ते २८ मे पर्यंत जिल्ह्यातील सर्व विधानसभा क्षेत्रात शिवार संवाद यात्रेतून शेतकीऱ्यांशी संवाद साधला जाणार आहे. पुढील १५ दिवसांत पंडित दीनदयाल उपाध्याय जन्मशताब्दी वर्षानिमित्य विस्तारक योजनेंतर्गत प्रत्येक बुथवर जावून घरोघरी भेटी देण्याचे कार्यक्रम, भाजपा आजीवन सहयोग निधी आदी कार्यक्रम नियोजनानुसार करण्याचे सांगितले. याप्रसंगी माजी आमदार केशवराव मानकर व संघटन महामंत्री विरेंद्र अंजनकर यांनीही मार्गदर्शन केले. तसेच आजीवन सहयोग निधीबाबत नगरसेवक भरत क्षत्रिय व दिनेश दादरीवाल यांनी माहिती दिली. नुकत्याच पार पडलेल्या गोरेगाव व तिरोडा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजपाला मिळालेल्या यशाकरिता जिल्हाध्यक्ष हेमंत पटले, आ. विजय रहांगडाले, मंडळ अध्यक्ष लक्ष्मण भगत, भाऊदास कठाणे यांचे ना. बडोले यांनी पुष्पगुच्छ देवून सत्कार केले. या वेळी बैठकीत मंडळ अध्यक्ष सुनील केलनका, छत्रपाल तुरकर, लक्ष्मण भगत, भाऊदास कठाणे, प्रमोद संगीडवार, अ‍ॅड. येशुलाल उपराडे, विजय बिसेन, परसराम फुंडे, धनेंद्र अटरे, मुन्ना शर्मा, नरेंद्र बाजपेयी, खेमराज लिल्हारे, प्रविण दहीकर, देवेंद्र टेंभरे, पवन अग्रवाल, आत्माराम दसरे, सुरेश पटले, महेंद्र बघेले आदी पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते. पालकमंत्र्यांचा दौरा पालकंमत्री राजकुमार बडोले हे २५ मेपासून शिवार संवाद कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. त्यांच्या नियोजित दौऱ्याप्रमाणे २५ मे रोजी अर्जुनी-मोर तालुक्यातील रांझीटोला येथे सकाळी ११ वाजता, येनोडी-जांभळी येथे दुपारी १२ वाजता , दुपारी १ वाजता धाबेपवनी येथे तर २ वाजता पांढरवाणी-रयत येथे उपस्थित झाले. त्याचबरोबर सडक अर्जुनी तालुक्यातील गावातील शेतकऱ्यांशीही ते संवाद साधणार असून येथील कोसमघाट येथे दुपारी ३ वाजता, खोडशिवनी येथे ४ वाजता तर डव्वा येथे पाच वाजता उपस्थित राहून शेतकीयांशी सवांद साधला. तर शुक्रवारी २६ मे रोजी आमगाव -देवरी विधान सभा क्षेत्राचा दौरा करणार असून सकाळी ११.३० वाजता साखरीटोला ( तिरखेडी) येथील पुलाचे लोकार्पण, दुपारी १२ .३० वाजता सलंगटोला शेतशिवार संवाद तर सायंकाळी ५ वाजता गोंदिया तालुक्यातील दवनीवाडा येथे शेत शिवार संवादातून शेतकऱ्यांशी संवाद साधतील.