शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर, ट्रम्प टॅरिफ मुद्द्यांवर विरोधक आक्रमक, आजपासून संसद अधिवेशन; सर्व मुद्द्यांवर चर्चेस सरकार तयार
2
उड्डाण करताच डाव्या बाजूचं इंजिन पेटलं; आगीमुळे बोईंगचे इमर्जन्सी लँडिंग
3
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
4
योगींचा दिल्ली दौरा अन् प्रदेशाध्यक्ष निवडीची चर्चा; ओबीसी चेहरा किंवा महिला नेत्याची होऊ शकते निवड
5
प्रचंड उष्म्यामुळे विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणावर होतोय परिणाम, दीड वर्षांपर्यंत होऊ शकते घट
6
जगातील कोणीही भारताला आदेश देऊ शकत नाही, ट्रम्प यांचा दावा अन् उपरराष्ट्रपतींचे खडेबोल
7
इस्रायल की सशस्त्र टोळ्यांचा हल्ला? गाझामध्ये मदतीची प्रतीक्षा करणाऱ्यांवरच गोळीबार, ७३ जण ठार
8
तरुणांना भाषणबाजी नको, रोजगार हवा! राहुल गांधी यांनी व्यक्त केली चिंता
9
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
10
"आमच्या निवेदनाला लाथाबुक्क्यांनी उत्तर देत असाल तर…’’, विजय घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया 
11
ऑपरेशन सिंदूरवेळी जीव धोक्यात घालून केली जवानांना मदत, आता लष्कराने १० वर्षांच्या मुलाला दिलं मोठं बक्षीस
12
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
13
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO
14
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
15
मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक
16
416%नं वाढला कंपनीचा नफा, आता शेअर खरेदीसाठी लोकांची झुंबड; ₹40 पेक्षाही कमी आहे किंमत!
17
हरीण बिथरले, महामार्गावरून सैरावैरा पळत सुटले, पुलावरून मारली उडी, झाला करुण अंत
18
असंवेदनशिल कृषीमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या; विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी
19
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
20
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...

शिवार संवादातून शासकीय योजनांची माहिती

By admin | Updated: June 2, 2017 01:27 IST

तालुक्यात शिवार संवाद सभेच्या माध्यमातून आमदार विजय रहांगडाले यांनी संवाद साधला असून त्यामध्ये

ग्रामीण भागात सभा : विकास कामांवरही टाकला प्रकाश लोकमत न्यूज नेटवर्कतिरोडा : तालुक्यात शिवार संवाद सभेच्या माध्यमातून आमदार विजय रहांगडाले यांनी संवाद साधला असून त्यामध्ये शासकीय योजनांची माहिती देवून शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले. यात राज्य सरकारने आतापर्यंत प्रामुख्याने राज्यातील ६८.६६ लक्ष हेक्टर क्षेत्र विमा संरक्षीत केला असून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, १४ जिल्ह्यात महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेचा शेतकऱ्यांना लाभ, तसेच ५०० कोटी लोकसहभागातून दोन वर्षात ११,४८६ गावांमध्ये २,६५,६७८ कामे आतापर्यंत केलेली असून अवघ्या ३,४२२ कोटी रुपयात ११६४,३४७ हेक्टर इतकी सिंचनक्षमता वाढली आहे. तसेच कृषी विभागांतर्गत मागेल त्याला शेततळे अंतर्गत ५२ हजार शेततळ्यांसाठी लाभार्थ्यांची निवड झालेली असून ४५ हजार शेततळ्यांना मंजूरी देण्यात आली. त्यामधून ९ हजार शेततळी पूर्ण झालेली आहेत. तसेच २०१९ पर्यंत दुष्काळमुक्तीकडे शासनाची वाटचाल सुरु असल्याचे सांगीतले. राज्यातील कृषीसिंचन क्षेत्र १६.०३ लाख हेक्टरवरून २०१५-१६ मध्ये १९.२२ लाख हेक्टर वर पोहोचली आहे. राज्यात २६ मोठ्या व मध्यम प्रकल्पाच्या पूर्तीसाठी केंद्राकडून ३८३० कोटी रु. तसेच नाबार्डकडून १२,८०० कोटी रुपये एवढी भरीव मदत झालेली आहे. तसेच पूर्व विदर्भात मालगुजारी तलावांच्या पुनरुज्जीवनाची विशेष मोहीम राबविली जात असून तालुक्याता भात खाचर दुरुस्ती व तलाव खोलीकरणाचे काम सुरु आहेत. तसेच जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून तिरोडा तालुक्यात सन २०१५-१६ मध्ये १४ गावे, सन २०१६-१७ मध्ये ९ गावे, सन २०१७-१८ मध्ये १० गावांची निवड तसेच गोरेगाव तालुक्यात सन २०१५-१६ मध्ये १ गाव, सन २०१६-१७ मध्ये ७ गावे, सन २०१७-१८ मध्ये ७ गावे असे विधानसभा क्षेत्रात ४८ गावामध्ये जलयुक्त शिवाराची कामे पूर्ण झाली असून त्याचा फायदा जनतेस होत आहे असे सांगीतले. ही सर्व विकासकामे सुरु असून यामध्ये कामांचा दर्जा चांगला होण्यासाठी संबंधित यंत्रणेने लक्ष द्यावे व यासंबंधी तक्रार असल्यास नागरिकांनी माझ्याशी संपर्क साधावा असे आवाहन डॉ. चिंतामन रहांगडाले यांनी शिवार संवाद चर्चेतून केले. तसेच शासनाने शेतकऱ्यांसाठी बी,बियाणे, खत पुरवठा, विज पुरवठा सुरळीत चालण्यासाठी सतत प्रयत्न केले आहेत. शिवार संवाद सभा तालुक्यात अर्जुनी, नहरटोला, मुंडीपार येथे घेतली असून शिवार संवाद सभेत प्रामुख्याने कृऊबास तिरोडाचे नवनिर्वाचीत संचालक डॉ. चिंतामण रहांगडाले, चतुर्भूज बिसेन, डॉ. वसंत भगत, पं.स.सदस्य डॉ. बी.एस.रहांगडाले, संजयसिंह बैस, तहसीलदार रामटेके, कुंभरे, गटविकास अधिकारी मानकर उपस्थित होते.