शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

महागाईमुळे किचनचे गणित बिघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2022 05:00 IST

पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार, असे सांगितले जात आहे. मात्र, असे झाल्यास त्यानंतर आणखी महागाई वाढणार, यात शंका नाही. सध्या खाद्यतेलासोबतच गहू, शेंगदाणा, रवा, मैदा, कणिक आदींचे दर वधारले आहे. प्रत्येकच वस्तूंचे दर ५-१० रूपयांची वधारले असून, यामुळे किचनचे महिन्याचा बजेट बिघडले आहे. यामुळे सर्वसामान्यांची अडचण होत असून, काय खावे अशा प्रश्न ते करत आहेत. शासनाने महागाई नियंत्रणात आणावी, ही एकच मागणी जोर धरू लागली आहे. 

कपिल केकतलोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :  रशिया - युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे महागाई वाढणार, असे सर्वत्र म्हटले जात होते. मात्र, आता या युद्धाचे पडसाद उमटू लागले आहेत. महागाईने आता आपले हातपाय पसरण्यास सुरूवात केली असून, प्रत्येकच वस्तूंचे दर आता वाढताना दिसत आहे. स्वयंपाकासाठी सर्वात महत्त्वाच्या खाद्यतेलांच्या दराचा भडका उडाला असून, याशिवाय अन्य किराणामालही चांगलाच वधारला आहे. पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार, असे सांगितले जात आहे. मात्र, असे झाल्यास त्यानंतर आणखी महागाई वाढणार, यात शंका नाही. सध्या खाद्यतेलासोबतच गहू, शेंगदाणा, रवा, मैदा, कणिक आदींचे दर वधारले आहे. प्रत्येकच वस्तूंचे दर ५-१० रूपयांची वधारले असून, यामुळे किचनचे महिन्याचा बजेट बिघडले आहे. यामुळे सर्वसामान्यांची अडचण होत असून, काय खावे अशा प्रश्न ते करत आहेत. शासनाने महागाई नियंत्रणात आणावी, ही एकच मागणी जोर धरू लागली आहे. 

गहू का महागला? -    व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अवघ्या जगात ३५ टक्के गहू रशियातून पुरवला जातो. आता रशिया व युक्रेनमध्ये युद्ध सुरू असल्याने रशियाकडून गव्हाचा पुरवठा बंद करण्यात आला आहे. त्यामुळे गव्हाचे दर वधारले आहेत. शिवाय अशा परिस्थितीत भारतातून गव्हाला मागणी वाढणार व त्यामुळेही गव्हाचे दर वाढले असून, येत्या काळातही अशीच स्थिती राहणार, असे दिसून येत आहे. 

सुर्यफूल व पामतेल बंद भारतात सुर्यफूल, सोयाबीन व पामतेल विदेशातून येते. यातील सुर्यफूल व सोयाबीन तेल रशिया व युक्रेन येथून येते. आता रशिया व युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे तेलाचा पुरवठा या देशांनी बंद केला आहे. परिणामी तेलांचे दर वधारले आहे. विशेष म्हणजे, या देशांकडे तेल आहे मात्र युद्धामुळे त्यांच्याकडून पुरवठा बंद असल्याने हा सर्व परिणाम जाणवत असल्याचे व्यापारी सांगतात. 

किचनचे बजेट कोलमडले 

युद्धामुळे महागाई वाढणार, असे सांगितले जात असतानाच आता त्याचे परिणाम दिसत आहे. खाद्यतेलाचे दर वधारलेले असतानाच किराणामालाचे दरही वधारले आहेत. अशात सर्वसामान्यांनी आता काय खावे, असा प्रश्न पडतो. शासनाने महागाई नियंत्रणात आणावी तेव्हाच सर्वसामान्यांना दोन घास मिळतील. - सीमा बैतुले (गृहिणी) 

खाद्यतेलांचे दर वधारले असल्याने स्वयंपाक करताना तेलाचा वापर सांभाळूनच करावा लागतो. अशात आता किराणामालाचेही दर वधारल्याने सर्वसामान्यांना दोनवेळचे जेवणही कठीण झाले आहे. गहू, कणिक, रवा, मैदा सर्वच महागले अशात काय खरेदी करावे व काय खावे, असा प्रश्न पडतो. - रेखा इंगळे (गृहिणी) 

अशीच स्थिती राहणार...रशिया व युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा हा परिणाम आहे. मात्र, आता हे दर कमी होतील, असे वाटत नाही. तसेच युद्ध थांबले तरीही त्यानंतर आणखी २-३ महिने अशीच स्थिती राहणार आहे. - बालचंद मुलचंदानी (व्यापारी)

 

टॅग्स :Petrolपेट्रोलDieselडिझेल