शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

महागाईचा राक्षस झाला जागा ! निवडणुका होताच गॅस सिलिंडर १०२५ रुपयांना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2022 05:00 IST

पाच राज्यातील निवडणुका आटोपताच केंद्र सरकारने गॅस सिंलिडरच्या दरात पुन्हा वाढ करण्यास सुरुवात केली आहे. महिनाभरापूर्वी ९७० रुपयांना मिळणाऱ्या गॅस सिलिंडरसाठी आता १,०२५ रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे गृहिणींचे बजेट बिघडले आहे. वाढत्या महागाईने खर्चाची जुळवाजुळव करताना तारांबळ उडत आहे. पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ झाल्याने महागाईत सातत्याने वाढ होत असून सर्वसामान्यांना महिन्याचे बजेट सांभाळताना चांगलेच नाकी नऊ येत आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोनामुळे आधीच रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच कर्मचाऱ्यांच्या पगारातही कपात केली आहे. अशात पेट्रोल, डिझेलसह गॅस सिलिंडरच्या किमतीमध्ये सातत्याने वाढ केली जात आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. सुरुवातीला ४०० रुपयांना मिळणाऱ्या गॅस सिलिंडरसाठी आता १,०२५ रुपये मोजावे लागत आहेत. यामुळे महिनाभराच्या खर्चाचा ताळमेळ जुळविताना चांगलीच दमछाक होत आहे. पाच राज्यातील निवडणुका आटोपताच केंद्र सरकारने गॅस सिंलिडरच्या दरात पुन्हा वाढ करण्यास सुरुवात केली आहे. महिनाभरापूर्वी ९७० रुपयांना मिळणाऱ्या गॅस सिलिंडरसाठी आता १,०२५ रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे गृहिणींचे बजेट बिघडले आहे. वाढत्या महागाईने खर्चाची जुळवाजुळव करताना तारांबळ उडत आहे. पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ झाल्याने महागाईत सातत्याने वाढ होत असून सर्वसामान्यांना महिन्याचे बजेट सांभाळताना चांगलेच नाकी नऊ येत आहे. 

चूल पेटविता येईना, गॅस परवडेना - शासनाने उज्ज्वला योजनेंतर्गत लाभार्थ्यांना गॅस सिलिंडर उपलब्ध करुन दिले. मात्र, गॅस सिलिंडर भरण्यासाठी गोरगरीब लाभार्थ्यांना १,०२५ रुपये आणायचे कुठून, असा प्रश्न निर्माण झाला आहे. - गॅस सिलिंडरच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने गृहिणींना महिन्याचे बजेट सांभाळताना चांगलीच कसरत करावी लागते. 

सबसिडी नावालच 

- गॅस सिलिंडरच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. पण, त्यावर दिल्या जाणाऱ्या सबसिडीलासुध्दा कात्री लावली जात आहे. ९७५ रुपये मोजल्यानंतर ४३ रुपयांची सबसिडी मिळत आहे. २सुरुवातीला गॅस सिलिंडरवर दीडशे रुपयांपर्यंत सबसिडी दिली जात होती. मात्र, आता त्यात सातत्याने कपात केली जात आहे. ३वर्षभराच्या कालावधीत गॅस सिलिंडरच्या दरात जवळपास ४५० रुपयांची वाढ झाली, तर सबसिडी मात्र ४३ रुपयांवर आली आहे. 

 केवळ गॅस सिलिंडरसाठी हजार रुपये कसे परवडतील? 

वाढत्या महागाईमुळे गृहिणींचे बजेट आधीच बिघडले आहे. त्यातच आता गॅस सिलिंडरच्या किमतीमध्ये सातत्याने वाढ केली जात असल्याने पुन्हा चुलीकडे वळण्याची वेळ आली आहे. उत्पन्न स्थिर असून, महागाई मात्र सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. केंद्र सरकारने किमान गॅस सिलिंडरच्या किमती कमी करण्याची गरज आहे.- श्वेता मस्के, गृहिणी

कोरोनामुळे आधीच रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच कर्मचाऱ्यांच्या पगारातही कपात केली आहे. अशात पेट्रोल, डिझेलसह गॅस सिलिंडरच्या किमतीमध्ये सातत्याने वाढ केली जात आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले असून, महिन्याचे बजेट सांभाळताना नाकीनऊ येत आहे. महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे.- कविता शिवणकर, गृहिणी  

टॅग्स :Cylinderगॅस सिलेंडर