शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

चान्ना परिक्षेत्रात कोरोनाचा शिरकाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2020 05:00 IST

ग्राम अरततोंडी व सिलेझरी येथील दोन तरुण अन्य ठिकाणच्या मित्रांसोबत काम करण्यासाठी मुंबईला गेले होते. कोरोनाचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत असल्याने ते गावाकडे १५ मे रोजी आले. अरततोंडी येथील एक २२ वर्षीय तरूण मुंबई ग्रीन कॉटन येथून गावात आला.

ठळक मुद्देअरततोंडी व सिलेझरीत खळबळ : २ तरूण कोरोना बाधीत

लोकमत न्यूज नेटवर्कबोंडगावदेवी : प्राथमिक आरोग्य केंद्र चान्ना अंतर्गत येणाऱ्या ग्राम अरततोंडी व सिलेझरी येथील २ तरूण कोरोना बाधीत निघाल्याने गावात खळबळ उडाली आहे. आरोग्य यंत्रणा खळबळून जागी झाली असून दोन्ही गावे प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घोषीत करण्यात आले आहे. दोन्ही गावच्या सीमा आवागमनासाठी सील करुन चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.परिसरातील ग्राम अरततोंडी व सिलेझरी येथील दोन तरुण अन्य ठिकाणच्या मित्रांसोबत काम करण्यासाठी मुंबईला गेले होते. कोरोनाचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत असल्याने ते गावाकडे १५ मे रोजी आले. अरततोंडी येथील एक २२ वर्षीय तरूण मुंबई ग्रीन कॉटन येथून गावात आला.ग्रामपंचायत पदाधिकारी व आपातकालीन समितीच्यावतीने त्या तरूणाला जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले. तर सिलेझरी येथील २० वर्षीय तरूण थेट राहत्या घरात जावून होम क्वारंटाईन झाला. सदर दोन्ही तरूण गडचिरोली व गोंदिया येथील कोरोना बाधितांच्या संपर्कात आल्याची माहिती मिळाल्याने त्या दोन्ही तरूणांना अर्जुनी-मोरगाव येथील कोवीड केअर सेंटरमध्ये बुधवारी (दि.२७) भरती करण्यात आले. दोन्ही युवकांचा तपासणी अहवाल प्राप्त होवून दोघेही कोरोना पॉझिटिव्ह निघाले. यामुळे दोन्ही गावांसह परिसरात खळबळ माजली आहे.प्राथमिक आरोग्य केंद्र चान्ना (बाक्टी) कार्यक्षेत्रातील गावांमध्ये दोन ठिकाणी कोरोनाचा शिरकाव झाल्याने आरोग्य विभाग जागे झाले असून शुक्रवारपासून कामाला लागल्याचे दिसत आहे. कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने अरततोंडी व सिलेझरी या गावांना कंटोनमेंट झोनमध्ये समाविष्ट करण्यात आले असून सीमा ये-जा करण्यासाठी त्वरीत बंद करण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले यांनी शुक्रवारी (दि.२९) काढले.प्राथमिक आरोग्य केंद्र चान्ना बाक्टीच्या कार्यक्षेत्रातील दोन गावांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्याने ग्रामीण भागात चिंतेचे सावट पसरले आहे. दोन्ही गावात पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. गावांमध्येही कोरोनाचा शिरकाव झाल्याने सामान्य जनता आजतरी दहशतीखाली जीवन जगत असल्याचे दिसून येत आहे. गावाजवळील गावांचा सुद्धा बफर झोनमध्ये समावेश करण्यात आला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या