शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

व्यक्तीची विद्वत्ताच नेहमीच कामी येते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 21:40 IST

व्यक्तीने शिक्षण घेऊन प्राप्त केलेली विद्वत्ताच नेहमीच कामात येते. शिक्षणामुळे अनेक अडचणीवर मात करणे शक्य असल्याचे मत जयंत शिक्षण संस्था आमगाव (रेल्वे)चे संस्थापक सचिव दिलीप मेश्राम यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देदिलीप मेश्राम : वार्षिक क्रीडा महोत्सवाचे थाटात उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कसाखरीटोला : व्यक्तीने शिक्षण घेऊन प्राप्त केलेली विद्वत्ताच नेहमीच कामात येते. शिक्षणामुळे अनेक अडचणीवर मात करणे शक्य असल्याचे मत जयंत शिक्षण संस्था आमगाव (रेल्वे)चे संस्थापक सचिव दिलीप मेश्राम यांनी व्यक्त केले.पंचशील हायस्कुल विज्ञान व कला कनिष्ठ महाविद्यालय मक्काटोला येथे दोन दिवसीय वार्षिक क्रीडा महोत्सव नुकताच आयोजित करण्यात आला होता. या वेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या वेळी जि. प. सदस्या लता दोनोडे, सालेकसा तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष रमेश चुटे, ग्रा.पं.मक्काटोलाचे सरपंच रामप्रसाद दोनोडे, ग्रा. पं. कोटराच्या सरपंच मीरा नाईक, ग्रा.पं. कडोतीटोलाच्या सरपंच कल्पना मडावी, ग्रा.पं. गांधीटोलाचे सरपंच गजानन राणे, तंमुस अध्यक्ष पुरुषोत्तम कोरे, शाळा व्यवस्थापन समिती दुर्गूटोलाचे अध्यक्ष इशुलाल दोनोडे व प्राचार्य व्ही.डी. मेश्राम उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात विद्येची देवता शारदा माता, सावित्रीबाई फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या छायाचित्राला माल्यार्पण करुन करण्यात आली. वार्षिक क्रीडा महोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांच्या खो-खो, कबड्डी, नृत्य व विविध सांस्कृतिक व बौद्धीक स्पर्धा घेण्यात आल्या. प्रास्ताविक सहाय्यक शिक्षक आर. एम. मुनेश्वर यांनी केले.याप्रसंगी लता दोनोडे यांनी विद्यार्थ्यांना विविध पुस्तकांचे वाचन करुन वाचनाची आवड निर्माण करण्याचे आवाहन केले. प्राचार्य मेश्राम यांनी विद्यार्थ्यांनी शिक्षण घेवून, देश सेवा करण्याचे आवाहन केले. संचालन शिक्षक एम. जी. कांबळे यांनी केले तर आभार प्रा. एम. जे. दिहारी यांनी मानले.