शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

हायरिस्कमधील व्यक्तींचे घरी जाऊन होणार लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 05:00 IST

सध्या बिछाण्यावर असलेली किंवा वयोवृद्ध  व्यक्ती लसीकरणासाठी जाऊ शकत नसल्याने ते लसीकरणापासून वंचित आहेत. अशात त्यांना जास्त धोका असून, अशांना हायरिस्कमध्ये गणले जात आहे. अशांना घरी जाऊन लसीकरण झाल्यास ते सुरक्षित होतील. मात्र, अद्याप जिल्ह्याला याबाबत आदेश आलेले नसल्याने घरोघर लसीकरणाला सुरुवात झालेली नाही. 

ठळक मुद्देजिल्ह्यासाठी अद्याप आदेश आलेले नाहीत

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत आता बोलले जात असून, ही लाट थोपविण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करण्यावर जोर दिला जात आहे. यातूनच आता मोठ्या शहरांमध्ये घरोघरी जाऊन लसीकरणाला सुरुवात झाली आहे. त्यातही हायरिस्कमधील व्यक्तींसाठी ही सोय केली जात आहे. यामुळे जी व्यक्ती लसीकरण केंद्रांवर जाऊ शकत नाही त्यांची सोय होणार आहे. शिवाय, लसीकरणापासून कुणीही व्यक्ती सुटणार नाही. शासनाचा हा उपक्रम अत्यंत लाभदायी ठरणार असून, यामुळे लसीकरणाची टक्केवारी वाढणार असून, कुणीही व्यक्ती सुटणार नसल्याने प्रत्येकाची कोरोनापासून सुरक्षा होणार आहे. सध्या बिछाण्यावर असलेली किंवा वयोवृद्ध  व्यक्ती लसीकरणासाठी जाऊ शकत नसल्याने ते लसीकरणापासून वंचित आहेत. अशात त्यांना जास्त धोका असून, अशांना हायरिस्कमध्ये गणले जात आहे. अशांना घरी जाऊन लसीकरण झाल्यास ते सुरक्षित होतील. मात्र, अद्याप जिल्ह्याला याबाबत आदेश आलेले नसल्याने घरोघर लसीकरणाला सुरुवात झालेली नाही. 

 मला लस कधी मिळणार? मला दोन्ही डोळ्यांनी दिसत नसल्याने घराबाहेर जाता येत नाही. मी पुतण्याजवळ राहत असून, ते आपल्या कामावर निघून जात असल्याने माझे लसीकरण झालेले नाही. अशात आमच्यासाठी लसीकरणाची काही सोय करता येणार आहे काय. जेणेकरून कोरोनापासून आमचा बचाव होऊ शकेल. - शकुंतला पंधरवार (पदमपूर) 

माझे वय झाल्यामुळे आता घराबाहेर निघता येत नाही. माझ्या घरी कुणीही नसल्याने मला लसीकरण केंद्रांवर जाता आले नाही व मला लस घेता आलेली नाली. कोरोनाबाबत ऐकूनच भीती वाटते, त्यामुळे घरी येऊन लस दिली जाणार काय. - कामनबाई मौजे (पोवारीटोला) 

हायरिस्कमध्ये कोण ?- अशी व्यक्ती जी बिछाण्यावरच पडून आहे व त्यांचे सर्व काही बिछाण्यावरच केले जात आहे. एखाद्या आजारामुळे किंवा वयामुळे जी व्यक्ती बिछाण्यावरून उठू शकत नाही किंवा घराबाहेर जाऊ शकत नाही. अर्धांगवायूने ग्रस्त असल्याने बिछाण्यावरच पडून असलेली व्यक्ती. अपघातामुळे सध्या बिछाण्यावर असलेली व्यक्ती, तसेच मानसिक आजाराने ग्रस्त असलेली व्यक्ती हायरिस्कमध्ये गणली जाते. 

अद्याप आदेश आलेले नाहीतसध्या मोठ्या शहरांमध्ये घरोघर जाऊन लसीकरण केले जात आहे. मात्र, जिल्ह्यात अद्याप याबाबत आदेश आलेले नाहीत. जिल्ह्यासाठी आदेश आल्यावर हायरिस्कमधील व्यक्तींना घरी जाऊन लस देता येईल. - डॉ. भुमेश पटले लसीकरण अधिकारी, गोंदिया.

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस